Nashik : चोरलेले ८५८ मोबाइल पुन्हा मालकांकडे; १ कोटी ३३ लाखांचे मोबाइल पोलिसांनी केले हस्तगत

Nashik : हरवलेला मोबाइल पुन्हा मिळेल, अशी आशा अनेक नागरिकांनी सोडून दिलेली असते. मात्र नाशिक पोलिसांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवत तब्बल ८५८ हरवलेले मोबाइल त्यांच्या मूळ मालकांकडे परत सुपूर्द केले आहेत. या मोबाइलची एकूण किंमत सुमारे १ कोटी ३३ लाख रुपये आहे. नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) सुरू केलेल्या ‘मोबाईल ट्रेस स्पेशल युनिट’ (एमटीएसयू) या विशेष पथकाने सामान्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवले आहे.


तांत्रिक कौशल्याच्या बळावर या पथकाने अवघ्या नऊ महिन्यांत तब्बल सव्वातीन कोटींहून अधिक किमतीचे जवळपास दोन हजार मोबाईल (Mobile) शोधून काढत ते मूळ मालकांच्या हातात सुपूर्द केले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हे पथक आता कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.



तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्य


दरम्यान, पोलिस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik) यांच्या हस्ते मोबाइल मालकांना त्यांचे हँडसेट सुपूर्द करण्यात आले. हरवलेला मोबाइल पुन्हा मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रूही तरळले.जुलै २०२५ पासून कार्यरत असलेल्या मोबाइल शोध विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण, मानवी कौशल्य आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे हे मोबाइल शोधून काढले. नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे विशेष आभार मानले.



नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ


या कार्यक्रमाला पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत गवळी, मोनिका राऊत, किशोर काळे यांची उपस्थिती होती. सहायक पोलिस आयुक्त तथा मोबाइल शोध विशेष पथकाचे प्रमुख संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली. हरवलेले मोबाइल शोधून ते मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्याच्या नाशिक पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाला असून, अनेक कुटुंबांना त्यांच्या मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याचा आनंद अनुभवता आला.

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला