Abhishek vs Vaibhav In T20 : अभिषेक की वैभव टी-२० चा खरा बादशाह कोण? आकडेवारी काय सांगते, जाणून घेऊया

मुंबई : अभिषेक आणि वैभव या दोघांपैकी टी-२० मध्ये सर्वात स्फोटक फलंदाज कोण? याची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. या दोघांनीही आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. दोघेही पहिल्या चेंडूपासून चौकार आणि षटकार मारतात. यामुळे सध्या टी-२० क्रिकेटमध्ये दोघांच्या नावाची दहशत निर्माण झाली आहे. पंधरा वर्षाच्या वैभव सूर्यंवशीने आपल्या टी-२० कारकीर्दीत ३८ टी-२० सामने खेळले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, ३८ टी-२० सामन्यांनंतर अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी या दोघांपैकी कोणत्या फलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. (Abhishek Sharma)



३८ टी-२० सामन्यांनंतर वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Sooryvanshi) कामगिरी


वैभवने आतापर्यंत देशांतर्गत आणि आयपीएलमध्ये एकूण ३८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने ४२.४० च्या सरासरीने आणि २१९ च्या स्ट्राइक रेटने १,५६९ धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने आयपीएलमध्ये २३ सामने खेळले आहेत. या २३ सामन्यांमध्ये त्याने ४४.६९ च्या सरासरीने आणि २२८ च्या स्ट्राइक रेटने १,०२९ धावा केल्या आहेत. वैभव बिहारकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. यात त्याने सात सामन्यांमध्ये १७० च्या स्ट्राइक रेटने २१० धावा केल्या आहेत. आयपीएल आणि देशांतर्गत केलेल्या कामगिरीच्या जोरावर वैभवला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे. भारताकडून खेळताना त्याने चार टी-२० सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह ९२ धावा केल्या आहेत.



वैभवने ३८ टी-२० सामन्यांमध्ये ११ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. यासह त्याने चार शतके आणि सात अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याने नोव्हेंबर २०२५ मध्ये दोहा येथे झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारत अ संघाकडून खेळताना केवळ ४२ चेंडूंमध्ये १४४ धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या खेळीत त्याने ११ चौकार आणि १५ षटकार मारले होते.धावांचा पाठलाग करताना वैभवने २० सामन्यांमध्ये ३४.९० च्या सरासरीने आणि २२५ च्या स्ट्राइक रेटने ६९८ धावा केल्या आहेत. ज्यात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतकही केले आहेत. प्रथम फलंदाजी करताना वैभवने १८ सामन्यांमध्ये ५१.२३ च्या सरासरीने आणि २१५ च्या स्ट्राइक रेटने ८७१ धावा केल्या आहेत. यात त्याने दोन-दोन शतक आणि अर्धशतकही केले आहेत. (Vaibhav Sooryvanshi)



३८ सामन्यांनंतर अभिषेक शर्माची (Abhishek Sharma) कामगिरी


अभिषेक शर्माने आपल्या टी-२० कारकिर्दीत पंजाबकडून २२ टी-२० सामन्यांमध्ये ३४ च्या सरासरीने ६१९ धावा केल्या आहेत. तर आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळताना त्याने पहिल्या १३ सामन्यांमध्ये २९ च्या सरासरीने ४७३ धावा केल्या आहेत. सलामीवीर म्हणून खेळलेल्या ३८ टी-२० सामन्यांमध्ये अभिषेकने एका शतकासह आणि सहा अर्धशतकांसह सात वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जानेवारी २०२१ मध्ये, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीदरम्यान अलूर येथे पंजाबकडून रेल्वेविरुद्ध खेळताना अभिषेकने ६२ चेंडूंमध्ये १०७ धावा केल्या. या खेळीत पाच चौकार आणि नऊ षटकारांचा समावेश होता. आयपीएल २०२२ मध्येही अभिषेकने नवी मुंबईत चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध SRH कडून खेळताना ५० चेंडूंमध्ये ७५ धावांची धडाकेबाज खेळी करून खळबळ उडवली होती.



अभिषेकने धावांचा पाठलाग करताना २३ टी-२० सामन्यांमध्ये ३४ च्या सरासरीने ७५२ धावा केल्या आहेत.ज्यात त्याने चार अर्धशतक केले आहेत. भारतासाठी खेळताना अभिषेकने सुरुवातीच्या १२ टी-२० सामन्यांमध्ये २७ च्या सरासरीने ३३ धावा केल्या आहेत. ज्यात त्याने एक शतक आणि दोन अर्धशतकही आहेत.(T20)



३८ सामन्यांनंतर कोण आहे प्रभावी ?


एकूण टी-२० मध्ये अभिषेकने २०४ सामन्यांमध्ये नऊ शतकं आणि ३७ अर्धशतकांसह ५९७४ धावा केल्या आहेत. वैभवला अजून खूप मोठ पल्ला गाठायचा आहे. मात्र पहिल्या ३८ सामन्यांनंतर वैभवने अभिषेकला मागे टागले आहे.

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या