Aishwarya Thackeray : राजकारण नाही, आता रुपेरी पडद्यावर एन्ट्री! बाळासाहेब ठाकरेंचा नातू YRF च्या बिग बजेट चित्रपटात झळकणार

मुंबई : ठाकरे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्याऐवजी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा निर्णय घेतलेल्या ऐश्वर्य ठाकरे (Aishwarya Thackeray) याच्या करिअरला मोठी संधी मिळाली आहे. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा नातू असलेला ऐश्वर्य आता यशराज फिल्म्स (YRF) च्या बिग बजेट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) करणार असून चित्रपटाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. हा एक रोमँटिक अॅक्शनपट असणार असून त्यामध्ये अहान पांडे (Ahaan Panday), शर्वरी वाघ (Sharvari Wagh) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. आदित्य चोप्रा (Aditya Chopra) आणि अली अब्बास जफर ही जोडी पाचव्यांदा एकत्र काम करत असून हा चित्रपट २६ मार्च २०२७ रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.



राजकारणाऐवजी निवडली अभिनयाची वाट :


ऐश्वर्य ठाकरेची (Aishwarya Thackeray) पार्श्वभूमी पूर्णपणे राजकीय असली तरी त्याने कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्याऐवजी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. लहानपणापासूनच त्याला अभिनय, चित्रपट आणि कलाक्षेत्राची आवड असल्याने त्याने बॉलिवूडची वाट निवडली.



कॅमेऱ्यामागून कॅमेऱ्यासमोर :


अभिनेता होण्यापूर्वी ऐश्वर्यने (Aishwarya Thackeray) चित्रपटसृष्टीतील कामकाज जवळून अनुभवले. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या २०१५ मधील सुपरहिट 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या 'निशांची' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.



सोशल मीडियावर कमी, पण चर्चेत कायम :


इतर स्टारकिड्सच्या तुलनेत ऐश्वर्य (Aishwarya Thackeray) सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही. त्याच्या इन्स्टाग्रामवर सुमारे १७ हजार फॉलोअर्स असून त्याने मोजक्याच पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यातील एका पोस्टमध्ये आजोबा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा खास फोटोही आहे. तसेच त्याच्या टॅग केलेल्या व्हिडिओंमध्ये त्याचे नृत्यकौशल्यही पाहायला मिळते.



बॉलिवूडमध्ये मोठा स्टार ठरणार?


पहिल्या चित्रपटानंतर थेट यशराज फिल्म्ससारख्या प्रतिष्ठित बॅनरची संधी मिळाल्याने ऐश्वर्य ठाकरेच्या (Aishwarya Thackeray) करिअरला मोठी चालना मिळाल्याचे मानले जात आहे. राजकीय घराण्यातून आलेला हा तरुण अभिनेता रुपेरी पडद्यावर स्वतःची वेगळी छाप पाडतो का, याकडे आता बॉलिवूड आणि प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’

Drishyam : ‘दृश्यम 3' चा बॉक्स ऑफिसवर जलवा ! आता 'दृश्यम 4’ येणार ? दिग्दर्शकाने स्पष्टच सांगितलं...

Drishyam 3 : अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपट मालिकेने प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली आहे. रहस्य, थरार