Attack On Aramco: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल आणि ड्रोन हल्ला; अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम अपयशी

मध्यपूर्वेतील (Middle East) वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. जगातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या 'अरामको' (Aramco) वर भीषण मिसाइल आणि ड्रोन हल्ला झाला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्यांना रोखण्यात अमेरिकेची अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम पूर्णपणे अपयशी ठरली आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.



सौदी अरेबियात स्फोटांचे सत्र आणि वीज पुरवठा खंडित


सौदी अरेबिया आज सकाळी सलग झालेल्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांमुळे हादरून गेला. या हल्ल्यामध्ये सौदीच्या जिजान (Jizan) औद्योगिक शहरात जोरदार स्फोटाचे आवाज ऐकू आले. जिजानमधील सौदीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या केंद्राला मिसाइल हल्ल्यामध्ये थेट टार्गेट करण्यात आले. या हल्ल्यामुळे जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीच्या सुविधांना मोठा धोका निर्माण झाला आहे. हल्ल्यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून अनेक भागांमधील वीज पुरवठा तात्काळ खंडित करण्यात आला आहे.



येमेनमधून झाला हल्ला; हूती बंडखोरांचा सहभाग


प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला येमेनमधून (Yemen) करण्यात आला असून, अरामकोशी संबंधित तेल सुविधा केंद्रांना विशेष लक्ष करण्यात आले आहे. येमेनमधून सौदी अरेबियाच्या जिजान, यानबू आणि दमाद या भागांवर मिसाइल आणि ड्रोनचा मारा करण्यात आला. या गंभीर परिस्थितीची दखल घेत सौदी सिविल डिफेन्स फोर्सने यानबू प्रांतासाठी तातडीने आपत्कालीन अलर्ट (Emergency Alert) जारी केला आहे.



जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता


अरामको ही जगातील ऊर्जा क्षेत्रातील सर्वांत मोठी कंपनी असल्याने, या हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले आहे, याबाबत अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे जगातील अनेक देशांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण या हल्ल्याचा थेट आणि विपरीत परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्यावर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



शांतता करार मोडला, लाल समुद्रातील व्यापारावर संकट


सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात आधीच युद्धजन्य परिस्थिती असताना, सौदी अरेबिया आणि येमेनमधील हूती (Houthi) बंडखोरांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. शुक्रवारी रात्री सौदी अरेबियाने येमेनमधील हूतींच्या नियंत्रणाखाली असलेल्या होदेइदा शहरावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्याचा बदला म्हणून हूतींनी सौदीच्या तेल प्रकल्पांवर आणि लाल समुद्रातील तेल टँकर्सना ड्रोन व मिसाइलने टार्गेट केल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे दोन्ही बाजूसांमधील २०२२ पासून चालत आलेला शांतता करार आता अधिकृतपणे मोडताना दिसत आहे. या सततच्या संघर्षामुळे लाल सागर मार्गावरील जागतिक व्यापाराची सुरक्षा धोक्यात आली असून, आगामी काळात आंतरराष्ट्रीय राजकारणात याचे गंभीर परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे