Crime News : सुरक्षिततेच्या नावाखाली लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा ठरला चिंतेचं साधन

मुंबई : घर, दुकान, हॉटेल, कार्यालय आदी ठिकाणी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे ही आता सामान्य बाब झाली आहे. हे सीसीटीव्ही(CCTV) कॅमेरे थेट प्रायव्हसीवर घाला घालतात असा विचारही कोणी करत नाही. पण मुंबईजवळच्या मीरा रोड येथे असा एक धक्कादायक प्रकार घडला आहे.(MIraroad News)



शेजाऱ्यांच्या घराबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा हा सुरक्षेसाठी असल्याचे मत घरात राहणाऱ्यांचे होते. पण तोच कॅमेरा प्रायव्हसीचा भंग करत आहे हे लक्षात आल्यावर स्थानिकांच्या पायाखालची जमीन सरकली.


सुरक्षा की फसवणूक ?


मीरा रोडमधील विनय नगर या परिसरातील एका प्लॅटमध्ये भाड्याने एक महिला राहते आणि तिच्या समोरच्या फ्लॅटमध्ये अमित झा नावाचा तरुण राहतो. अमित झा याने त्याच्या घराबाहेर एक विशेष ३६० अंशात फिरणारा सीसीटीव्ही कॅमेरा लावला होता. मात्र या कॅमऱ्याद्वारे आपल्या वैयक्तिक आणि खासगी आयुष्यात थेट डोकावले जात असल्याची शिवाय व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असल्याची बाब तरुणीच्या लक्षात आली. या मुद्यावरून तरूणी आणि कॅमेऱ्याचा मालक यांच्यात वाद झाला.(Crime News)



नराधमाने तरुणीला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची दिली धमकी


दोघांमधील वाद विकोपाला गेला. महिलेने याआधी अमित झा विरोधात एनसीआर देखील दाखल के होती, असे सर्व असतानाही आरोपीने महिलेचे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. धक्कादायक म्हणजे जेव्हा महिलेचे खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे तिला कळले तेव्हा ती प्रचंड तणावाखाली गेली होती आणि त्यानंतर तिने याबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवली.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण