Marathi Movie : "मामाच्या गोव्याला जाऊया" चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अंकुश चौधरीचा खतरनाक 'डॉन' अवतार अन् तगडी स्टारकास्ट!

बॉलीवूडच्या 'धम्माल'ला देणार टक्कर! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलरमध्ये कॉमेडी, सस्पेन्स अन् ॲक्शनचा भन्नाट तडका


आगामी मराठी सिनेमा 'मामाच्या गोव्याला जाऊया' चा धमाकेदार ट्रेलर(Trailor) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कॉमेडी, सस्पेन्स, थ्रिलर आणि ॲक्शनचा जबरदस्त मेळ असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे.



गोव्याची ट्रिप अन् अचानक 'डॉन'ची एंट्री!


ट्रेलरची सुरुवात 'संत्या', 'बाबा', 'कुश्या' आणि 'मामा' यांच्या गोव्याच्या मजेशीर ट्रिपने(Trip) होते. या चौघांमधील भन्नाट केमिस्ट्री, धमाल गमतीजमती आणि सतत ओढवणारा गोंधळ प्रेक्षकांना खळाळून हसवतो. हीच हास्यजत्रा अचानक एका वेगळ्या वळणावर पोहोचते. अभिनेते अंकुश चौधरी यांनी साकारलेला साधा, भोळाभाबडा 'मामा' एका क्षणात एका खतरनाक 'डॉन'च्या अवतारात समोर येतो आणि ट्रेलरचा संपूर्ण टोन बदलून जातो!



कलाकारांची तगडी फौज आणि कॉमेडीचा तडका


चित्रपटात अंकुश चौधरीसोबत कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर या चौघांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. याशिवाय चित्रपटात(Movie) महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांच्याही महत्त्वपूर्ण व दमदार भूमिका आहेत. तसेच नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांच्या ग्लॅमरस अंदाजाने ट्रेलरमध्ये अधिकच रंग भरला आहे.



सस्पेन्स अन् ॲक्शनचा धमाका


मामा नक्की कोण आहे? तो खरोखरच डॉन आहे की त्यामागे आणखी काही मोठं रहस्य दडलंय? या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळणार आहेत. गोव्याच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर मैत्री, विनोदाचे परफेक्ट टायमिंग, पाठलाग आणि ॲक्शनचा भन्नाट अनुभव हा सिनेमा प्रेक्षकांना देणार हे नक्की!

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या