Nashik : नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार - मंत्री छगन भुजबळ

Nashik : अंदरसुल येथे उभारण्यात आलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध होवून ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले अंदरसूल, ता. येवला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसूल मुख्य इमारतीचे उद्घाटन मंत्री श्री.भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.



या केंद्राला तीन वेळा 'कायाकल्प' पुरस्कार


मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात सुमारे 46 हजार लोकसंख्या असून केंद्रामार्फत उत्कृष्ट आरोग्य सेवा दिली जात आहे. स्वच्छता, सुयोग्य व्यवस्थापन व दर्जेदार सेवेमुळे या केंद्राला तीन वेळा 'कायाकल्प' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. येथे दररोज ८० हून अधिक बाह्यरुग्णांवर उपचार केले जातात, तर दरमहा सुमारे दीड हजारांहून अधिक रुग्ण ओपीडीचा लाभ घेतात. याशिवाय सुरक्षित प्रसूती सेवा, माता-बाल आरोग्य, लसीकरण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, आपत्कालीन सेवा आदी विविध सुविधा प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.


केंद्राला मिळालेला सन्मान हा केवळ इमारतीचा नसून येथे कार्यरत डॉक्टर, परिचारिका व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेमुळे मिळाल्याचे सांगत मंत्री श्री.भुजबळ यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. "जनसेवा हीच ईश्वरसेवा" या भावनेतून आरोग्य कर्मचारी नागरिकांची सेवा करत असून त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आवश्यकतेच्या वेळी दर्जेदार उपचार तत्काळ उपलब्ध व्हावेत, यासाठी शासन आरोग्य सुविधांचे बळकटीकरण सातत्याने करत असल्याचे मंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.



यानंतर येवला रेल्‍वे स्‍टेशन जवळ, पंचायत समिती निवासस्थानाजवळ तालुका सार्वजनिक आरोग्य केंद्र प्रयोगशाळा भुमीपूजन मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, डॉ जयश्री पवार उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, वैद्यकीय अधिकारी, डॉ.जयश्री पवार, डॉ सचिन वैद्य, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद तारू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, आशा सेविका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण