Ind VS Zim : झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत दिला भारताला दुहेरी धक्का ! अभिषेक आणि वैभव पॉवर प्ले संपण्यापूर्वी बाद

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे खेळवला जात आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने पहिला टी-२० सामना जिंकत या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (Ind VS Zim)



झिम्बाब्वेच्या ब्लेसिंह मुझारबानीने भारताला पहिला झटका दिला आहे. त्याने दुसर्‍या षटकात अभिषेक शर्माला बाद करत भारताला पहिला झटका दिला आहे. अभिषेकने ८ चेंडूंम्ध्ये फक्त आठ धावा केल्या आहेत. त्यानंतर वैभवही नऊ चेंडूंमध्ये २० धावा करत बाद झाला आहे. झिम्बाब्वेच्या रिचर्ड नगारावने तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूंवर वैभवला बाद करत भारताच्या अडचणीत भर टाकली आहे.भारताने या सामन्यासाठी आपल्या संघात एक मोठा बदल केला आहे. यश ठाकूरला पदर्पणाची संधी देण्यात आली आहे. तर अशोक शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. आता, दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत अभेद्य आघाडी मिळवण्याचा प्रयत्न करेल. भारताने आतापर्यंत ५.२ षटकात दोन बाद ४७ धावा केल्या आहेत. कर्णधार श्रेयस अय्यरसह ईशान किशनने झिम्बाब्वेच्या गोलंदाजीवर फटकेबाजी सुरू केली आहे. (Vaibhav Sooryvanshi)




टी-२० मालिकेसाठी भारत आणि झिम्बाब्वेचे संघ


भारतीय संघ : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, शिवम दुबे, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, अशोक शर्मा, मयंक यादव, सुर्यांश शेडगे, हर्ष दुबे, प्रभास सिंह, प्रभाकर सिंह.


झिम्बाब्वे संघ: ब्रायन बेनेट, तादिवानाशे मारुमनी (विकेटकीपर), बेन कुरन, डिओन मायर्स, सिकंदर रझा (क), रायन बर्ल, वेस्ली माधेवेरे, ब्रॅड इव्हान्स, न्यूमन न्यामुरी, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, तफादझ्वा त्सिगा, तफादझ्वा त्सिगा, वेलेंटाका, इनोसेंट्का.

Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या