Minister Ravneet Singh Bittu : "मोदी मंत्रिमंडळात मोठी घडामोड! रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू यांचा राजीनामा; फेरबदलाच्या चर्चांना उधाण"

- राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना नवे वळण, पंजाबच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता


नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या (Modi Government) मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या चर्चांना वेग आला असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंह बिट्टू (Minister Ravneet Singh Bittu) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार त्यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारल्याची माहिती राष्ट्रपती भवनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.


राष्ट्रपती भवनाच्या निवेदनानुसार, भारतीय संविधानाच्या कलम ७५(२) अंतर्गत पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार बिट्टू (Minister Ravneet Singh Bittu) यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मोदी मंत्रिमंडळातील हा निर्णय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.



फेरबदलाच्या चर्चांना बळ :


गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेबदलाच्या चर्चांना जोर आला आहे. अशातच बिट्टू यांच्या राजीनाम्यामुळे लवकरच मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या जागी नवीन रेल्वे राज्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती होणार, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Minister Ravneet Singh Bittu)



राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही :


रवनीत सिंह बिट्टू (Minister Ravneet Singh Bittu) यांनी राजीनामा का दिला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ जून महिन्यात संपला असून, आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.



पंजाबवर भाजपचा फोकस :


सूत्रांच्या मते, सीमावर्ती पंजाबमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी बिट्टू यांची महत्त्वाची भूमिका असू शकते. सध्या राज्यात आम आदमी पक्ष (AAP) सत्तेत असून, भाजप पंजाबमध्ये आपला जनाधार वाढवण्यावर भर देत आहे.


दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर येथे कथित NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणावरून आंदोलन सुरू असतानाच केंद्र सरकारमधील या राजीनाम्यामुळे राजधानीतील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत केंद्र सरकार पुढे कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण