Devendra Fadnavis : "पंढरपूर कॉरिडॉरमुळे भाविकांना मोठा दिलासा, कोणावरही अन्याय होणार नाही"; आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा

- अडीच वर्षांत पूर्ण होणार मंदिर परिसर विकास, वारकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार


पंढरपूर : आषाढी एकादशीच्या (Ashadhi Wari) पावन मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी पंढरपूर कॉरिडॉरबाबत मोठी घोषणा करत त्यांनी सांगितले की, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराचा विकास कोणावरही अन्याय न करता आणि सर्वांचे योग्य पुनर्वसन करून करण्यात येणार आहे. हे महत्त्वाकांक्षी काम पुढील अडीच वर्षांत पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


महापूजेनंतर मंदिर समितीच्या सत्कार समारंभात बोलताना मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, दरवर्षी विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात येतात. वाढत्या गर्दीमुळे मंदिर परिसरात जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे भाविकांना अधिक सुरक्षित, सुसूत्र आणि सुलभ दर्शन मिळावे यासाठी पंढरपूर कॉरिडॉर (Pandharpur Corridor) उभारला जाणार आहे.


मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, या प्रकल्पात स्थानिक नागरिक, व्यापारी आणि भाडेकरू यांच्या हिताचे पूर्ण संरक्षण केले जाईल. कोणालाही अन्याय होणार नाही, तर योग्य पुनर्वसन करूनच विकासकामे पुढे नेली जातील. यामुळे स्थानिकांचा व्यवसाय वाढेल, नागरिकांना चांगली घरे मिळतील आणि भविष्यात कितीही भाविक आले तरी दर्शन व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल.



यंदाच्या आषाढी वारीने नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे सांगताना त्यांनी नमूद केले की, दर्शनासाठी तब्बल २५ किलोमीटरहून अधिक लांबीची रांग लागली होती. अनेक भाविकांना दर्शनासाठी २५ तास प्रतीक्षा करावी लागली, तरीही वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी नव्हती. विठ्ठल नामाच्या गजरात त्यांनी आनंदाने दर्शन घेतले, ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेची ओळख असल्याचे मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले.


वारीदरम्यान स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आल्याचे सांगत त्यांनी चंद्रभागा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी आणि वाळवंट परिसरात कचरा व अस्वच्छता दूर करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. त्यामुळे भाविकांना अधिक स्वच्छ आणि सुंदर वातावरण अनुभवता आल्याचे त्यांनी नमूद केले.


मुख्यमंत्री (Devendra Fadnavis) म्हणाले की, वारकरी म्हणजे केवळ भाविक नाहीत, तर राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, उद्योजक आणि समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा मानून राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ५६ लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोफत वीज आणि थकीत वीजबिल माफीसारखे महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.



यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, (Girish Mahajan) कामगार मंत्री आकाश फुंडकर, अमृता फडणवीस, (Amruta Fadnavis) विविध लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले. पाणी संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, प्लास्टिकमुक्त वारी आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती करणाऱ्या दिंड्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच शासकीय महापूजेचे मानकरी वारकरी बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती माने यांचा सत्कार करून त्यांना वर्षभरासाठी मोफत एसटी प्रवास पासही प्रदान करण्यात आला.




Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न