Abhishek & Aishwarya ; बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीचा न्यूयॉर्क मधील फोटो व्हायरल, विभक्त होण्याच्या चर्चांना पूर्णविराम !

मुबई : अलीकडेच, बॉलीवूड मधील प्रसिद्ध स्टार ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवताना दिसले होते. त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. ज्यामध्ये हे जोडपे(Couple) न्यूयॉर्कमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. फोटोमध्ये, दोघेही कॅज्युअल कपड्यांमध्ये त्यांच्या चाहत्यांसोबत हसतमुखाने सेल्फीसाठी पोज देताना दिसत आहेत.



ऐश्वर्या-अभिषेक आणि आराध्या


अभिषेक बच्चन सध्या शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि सुहाना खान यांच्या 'किंग' चित्रपटाच्या (Movie) शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, या फोटोमधून असे दिसून येते कि त्यानं आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे आणि आता तो आपल्या पत्नीसोबत वेळ घालवत आहेत. मात्र, हा फोटो पाहिल्यानंतर सर्व चाहत्यांच्या मनात एकाच प्रश्न आहे तो म्हणजे त्यांची लाडकी मुलगी आराध्या कुठे आहे? खरं तर, ऐश्वर्या आणि अभिषेक जिथे कुठे जातात, तिथे त्यांची मुलगी आराध्या नेहमी त्यांच्यासोबत असते. पण या फोटो मध्ये आराध्या दिसली नाही म्हणून चाहत्यांनी हा प्रश्न उचलून धरला आहे.




अफवांना पूर्णविराम!


नुकतेच, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन एका हाय-प्रोफाईल लग्नाला उपस्थित राहिले होते, जिथे त्यांची मुलगी आराध्यासुद्धा सोबत होती. फोटोंमध्ये, तिघेही एकत्र हसताना आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेताना दिसले. यामुळे मतभेदांच्या चर्चा तात्काळ थांबल्या. अलीकडेच ऐश्वर्या आणि अभिषेकच्या विभक्त होण्याच्या जोरदार अफवाही पसरल्या होत्या, परंतु या फोटोमुळे काहीही न बोलता या अफवांना त्वरित पूर्णविराम मिळाला आहे.



अभिषेक बच्चनबद्दल बोलायचे झाल्यास, तो रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटात दिसला होता, ज्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात त्याने संभाजी शहाजी भोसले अर्थात शिवाजी महाराजांचे बंधू आणि शहाजी राजांचे चिरंजीव यांची भूमिका साकारली होती. आता अभिषेक बच्चन शाहरुख खान, सुहाना खान आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे .ऐश्वर्या राय बच्चन ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती शेवटची २०२३ मध्ये मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन II' मध्ये दिसली होती आणि तिच्या आगामी चित्रपटांबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या