Prime Minister Modi : पंतप्रधान मोदींकडून पॉवरलिफ्टर झंडू कुमारचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन

नवी दिल्ली : भारताने २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या दुसऱ्या दिवसाचा शेवट एका पदकासह आणि अनेक दमदार कामगिरींसह केला. झंडू कुमारने (Zhandu Kumar) पॅरा पॉवर पॅरालिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकून ग्लासगो येथे भारताच्या पदकतालिकेचे उद्घाटन केले. भारतीय खेळाडूंनी जलतरण, बॉक्सिंग आणि लॉन बाऊल्समध्येही चांगली कामगिरी केली. (Commonwealth Games 2026).पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकल्याबद्दल भारतीय पॅरा-पॉवरलिफ्टर झंडू कुमारचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

 



 

पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत (Para Powerlifting) कांस्यपदक (Bronze medal) जिंकून झंडू कुमारने भारताला पहिले पदक मिळवून दिलले. या २८ वर्षीय खेळाडूने १८१ किलो आणि १९० किलो वजन यशस्वीरित्या उचलून १३०.९ गुण मिळवले. तो निर्णायक १९६ किलोचा प्रयत्न पूर्ण करू शकला नाही. या स्पर्धेतील भारताचा दुसरा खेळाडू सुधीर होता, जो ११४.१ गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला. नायजेरियाच्या इद्रिस रिलुवानने १३२.८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. मॅथ्यू हार्डिंगने १३१ गुणांसह रौप्यपदक पटकावले. (Commonwealth Games 2026)



पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले, "झंडू कुमारची शानदार कामगिरी! त्याने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा-पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदक जिंकून २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकतालिकेचे उद्घाटन केले आहे. त्याचे अभिनंदन! त्याची ही कामगिरी त्याची प्रचंड ताकद, अढळ निर्धार आणि अनेक वर्षांच्या शिस्तबद्ध मेहनतीचे एक उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून, त्याने संपूर्ण राष्ट्राला गौरव मिळवून दिला आहे आणि असंख्य भारतीयांना प्रेरणा दिली आहे."भारतीय पॅरा-पॉवरलिफ्टर झंडू कुमारने शुक्रवारी रात्री उशिरा पुरुषांच्या हेवीवेट पॅरा-पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्य पदक जिंकून देशाला या स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले.


भारताचा पदकतालिकेत पहिल्या १० मध्ये प्रवेश :


एका पदकासह भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ च्या (Commonwealth Games 2026) पदकतालिकेत अव्वल १० देशांमध्ये स्थान मिळवले आहे. एका कांस्य पदकासह भारताने ९ वे स्थान पटकावले आहे. एकूण १३ पदकांसह ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. विशेष म्हणजे, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकूण ७४ देशांनी सहभाग घेतला होता.
Comments
Add Comment

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित

IND vs WI: वेस्ट इंडिजने चौथ्या सामन्यात डाव साधला, भारताला नमवून मालिकेत 2-2 ने बरोबरी

वेस्ट इंडिजने चौथ्या टी20 सामन्यात भारताला नमवून मालिका विजयाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. या मालिकेत चौथ्या

IND vs WI: शाई होपने भारतीय गोलंदाजांना धुतलं, शतक ठोकत टीम इंडियाला बॅकफूटला ढकललं

भारत वेस्ट इंडिज मालिकेतील चौथा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सुरू आहे. या