Nashik News : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

Nashik News : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विविध धरणांमधून शनिवारी देखील पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 8, 370 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. नदीकाठावरील नागरिकांनी, शेतकर्‍यांनी आणि व्यावसायिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.


गंगापूर धरणासह जिल्ह्यातील अन्य धरणांतूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. नांदूर मध्यमेश्वर बंधार्‍यातून सर्वाधिक 64 हजार 726 क्युसेक पाण्याचा प्रवाह पुढे सोडण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या खालच्या प्रवाहातील गावांनी विशेष सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.



६ वाजता धरण विसर्ग (क्युसेकमध्ये)


गंगापूर - 8370


कादवा - 5932


भावली - 1821


पालखेड - 3540


पुणेगाव - 1568


जोझरखेड - 1750


होळकर ब्रिज - 12300


दारणा - 13100


गौतमी गोदावरी - 1500


कश्यपी - 500


नांदूर मध्यमेश्वर धरण - 64726


वालदेवी - 2175


भाम - 3892


चणकापूर धरण - 5425



मुसळधार पावसाने सातशे कुटुंब बेघर


दरम्यान, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हातील जवळपास सर्वच धरणे तुडुंब भरली आहे. ज्यामुळे अनेक धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत देखील वाढ झाली आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने निफाड तालुक्यातील चांदोरी आणि सायखेड्यात पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ आलीय. तर चांदोरीत तब्बल ४०० कुटुंबांचे तर सायखेड्यात २५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. चांदोरीत या पुरामुळे तब्बल १०० तर सायखेड्यात १२५ दुकानांमधील मालाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.



या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार सोबतच ग्रामीणच्या अपर पोलिस अधीक्षक विमला एम. यांनी पूरग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पूरग्रस्त भागात काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक शक्य नसल्याने सीईओ पवार यांनी थेट ट्रॅक्टरवरून पूरग्रस्त भागात जाऊन नागरिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष माहिती घेतली. यानंतर सर्व विभाग प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायतीमार्फत सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या राहण्याच्या व इतर आवश्यक सुविधांची पाहणी करण्यात आली.


Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण