Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, तो जूनअखेरच्या २२ टक्क्यांवरून थेट ५६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. राज्यातील धरणांमध्ये सध्या सुमारे ८०३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, या वाढीचा लाभ राज्यातील सर्वच भागांना समान प्रमाणात मिळालेला नसल्याने मराठवाडा आणि विदर्भातील जलस्थिती अजूनही चिंतेचा विषय ठरत आहे. (Maharashtra Water Storage)

जूनअखेर राज्यातील धरणांमध्ये केवळ ३२४.५४ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. त्यानंतर जुलैच्या पहिल्या तीन आठवड्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या महिनाभरात धरणांमध्ये ४७८ टीएमसीहून अधिक पाण्याची भर पडली. त्यामुळे राज्याच्या एकूण जलसाठ्यात मोठी सुधारणा झाली आहे. (Water Storage)



पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक प्रमुख धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. कोयना (६८ टक्के), उजनी (६८ टक्के), भातसा (८७ टक्के), मुळशी (९५ टक्के), डिंभे (८५ टक्के), भंडारदरा (९० टक्के) आणि कन्हेर (९४ टक्के) या धरणांमधील साठा दिलासादायक आहे. (Dam Water Level)

मात्र, छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांची स्थिती अद्यापही समाधानकारक नाही. या विभागातील धरणांमध्ये केवळ २८ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, राज्यातील महत्त्वाच्या जायकवाडी धरणात फक्त ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पाणीपुरवठा आणि जलव्यवस्थापनाचे आव्हान कायम असल्याचे चित्र आहे.राज्यातील जलसाठ्यात एकूण वाढ झाली असली तरी पावसाचे असमान वितरण लक्षात घेता आगामी काळात पाण्याचे नियोजन आणि प्रभावी जलव्यवस्थापन अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. (Marathwada Dam)
Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने