Vijay Wadettiwar : गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का; वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची एंट्री

गडचिरोली : गडचिरोलीच्या राजकारणात (Politics) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने मोठी राजकीय खेळी केली आहे. धानोरा नगरपंचायतीच्या (Municipal Council) नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष (Vice President) आणि तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश (Party Joining) सोहळा पार पडला.


धानोरा नगरपंचायतीत (Municipal Council) काँग्रेसचे १३ नगरसेवक होते. मात्र, उपनगराध्यक्ष ललित बरछा यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम, भूषण उंदीरवाडे, माणिक मडावी, कालिदास मोहुर्ले, नरेश चिमूरकर, सुषमा भुरसे, सीमा काटेंगे आणि यामिना पेंदाम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या घडामोडीनंतर काँग्रेसकडे केवळ चार नगरसेवक उरले असून धानोरा नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे (Political Equations) पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.



आगामी स्थानिक स्वराज्य संस्था (Local Body) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा राजकीय विजय मानला जात आहे. दुसरीकडे, विजय वडेट्टीवार यांच्या प्रभावक्षेत्रात (Stronghold) झालेल्या या पक्षांतरामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


धानोरा नगरपंचायत (Municipal Council) निवडणुकीत काँग्रेसने १७ पैकी १३ जागा जिंकत एकहाती सत्ता (Majority) मिळवली होती. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने या नगरपंचायतीत मोठे यश संपादन केले होते. मात्र, आता त्याच १३ पैकी ९ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगरपंचायतीतील सत्तेचे (Power) चित्र बदलले आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशात नगराध्यक्षांचाही समावेश असल्याने हा विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.


महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे धानोरा नगरपंचायतीवर भाजपचे वर्चस्व (Dominance) निर्माण झाल्याचे चित्र असून, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा पक्षासाठी महत्त्वाचा राजकीय टप्पा मानला जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण