ICC T20 Rankings Team India : भारतासाठी झिम्बाब्वे मालिका ठरली 'लकी'! ICC टी-२० यादीत भारत पुन्हा एकदा अव्वल

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा आयसीसी पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर झेंडा फडकावला आहे. इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-० असा पराभव स्वीकारावा लागल्याने भारताला पहिल्या स्थानावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरावे लागले होते. मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत सलग दोन सामने जिंकत 'टीम इंडिया'ने दमदार पुनरागमन करत पुन्हा एकदा नंबर वनचा मान पटकावला आहे. (ICC T20 Rankings Team India)



सध्याच्या आयसीसी क्रमवारीनुसार भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांचे २६८ रेटिंग गुण आहेत. मात्र, एकूण गुणसंख्येच्या आधारे भारताने इंग्लंडला मागे टाकले आहे. भारताच्या खात्यात १६,०८८ गुण असून इंग्लंडचे १०,१८६ गुण आहेत. त्यामुळे समान रेटिंग असूनही भारत पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.



ऑस्ट्रेलिया तिसऱ्या, न्यूझीलंड चौथ्या स्थानावर :


आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया २६० रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. न्यूझीलंड २४७ गुणांसह चौथ्या, तर दक्षिण आफ्रिका २४४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांनीही अव्वल दहामध्ये आपले स्थान कायम राखले आहे. (ICC T20 Rankings Team India)



ICC पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय संघ क्रमवारी (Top १०) :


- भारत – २६८ रेटिंग गुण (१६,०८८ गुण)
- इंग्लंड – २६८ रेटिंग गुण (१०,१८६ गुण)
- ऑस्ट्रेलिया – २६० रेटिंग गुण
- न्यूझीलंड – २४७ रेटिंग गुण
- दक्षिण आफ्रिका – २४४ रेटिंग गुण
- पाकिस्तान – २४० रेटिंग गुण
- वेस्ट इंडिज – २३४ रेटिंग गुण
- बांगलादेश – २२४ रेटिंग गुण
- श्रीलंका – २२१ रेटिंग गुण
- अफगाणिस्तान – २२० रेटिंग गुण (ICC T20 Rankings Team India)



झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाने केवळ मालिका जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकले नाही, तर जागतिक टी-20 क्रिकेटमध्ये आपले वर्चस्वही पुन्हा सिद्ध केले आहे. आता मालिकेतील तिसरा सामना जिंकून भारत अव्वल स्थान आणखी भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. (ICC T20 Rankings Team India)

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त