हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात ९० धावांनी विजय मिळवत मालिका २-० ने आपल्या नावे केली आहे. भारताने सलग दोन टी-२० मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात पहिली मालिका जिंकली आहे. आता मालिकेतील तिसरा सामना आज २६ जुलै रोजी हरारे स्टेडियम येथे संध्याकाळी ४:३० वाजता खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने दुसऱ्या सामन्यानंतर स्पष्ट केले की एक खेळाडू जखमी आहे, ज्यामुळे या सामन्यात संघाची प्लेइंग-११ बदलणार आहे. (Ind vs Zim)
प्रिन्स यादव जखमी
प्रिन्स यादवला झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. सामन्यानंतर कर्णधार अय्यरने प्रिन्सच्या दुखापतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. प्रिन्सला हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली आणि तो लंगडत मैदानाबाहेर गेला. त्याच्या अनुपस्थितीमुळे, गेल्या काही महिन्यांपासून भारताला भेडसावणाऱ्या तंदुरुस्तीच्या चिंतांमध्ये आणखी एका समस्येची भर पडली आहे. (Shreyas Ayar)
अभिषेक संघातून बाहेर
या तिसऱ्या सामन्यापासून अभिषेक शर्माला विश्रांती देण्यात येऊ शकते. अभिषेकच्या जागी देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या प्रभसिमरन सिंहला संधी दिली जाऊ शकते. प्रभसिमरन सिंहला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी देण्यासाठी योग्य वेळ आहे. यामुळे अभिषेकच्या जागी त्याला प्लेइंग-११ मध्ये संधी देण्यात येऊ शकते.
View this post on Instagram
तिसऱ्या सामन्यात चार नवीन खेळाडूंना संधी मिळणार
पहिल्या दोन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या रवी बिश्नोईच्या जागी फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू हर्ष दुबेला टी-२० पदार्पणाची संधी देण्यात येऊ शकते. हर्षने आपल्या एकदिवसीय पदार्पणात चांगली कामगिरी केली होती. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज अशोक शर्माला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. आता, तो दुखापतग्रस्त प्रिन्स यादवच्या जागी संघात परत येऊ शकतो. या सामन्यात सूर्यांश शेडगेला शिवम दुबेच्या जागी संधी देण्यात येऊ शकते.
तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाची संभाव्य प्लेइंग-११
प्रभसिमरन सिंग/अभिषेक शर्मा , वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग , सूर्याश शेडगे/शिवम दुबे , हर्ष दुबे/रवी बिश्नोई, अशोक शर्मा/प्रिन्स यादव, यज्ञ यादव आणि यादव.






