Indian Youth Hockey Team : भारताने एफआयएच युथ हॉकी फाईव्ह्स आशियाई चॅम्पियनशिप जिंकली

मस्कत : भारताच्या सब-ज्युनियर पुरुष संघाने पाकिस्तानला ३-१ ने पराभूत करत एफआयएच युथ हॉकी फाईव्ह्स आशियाई चॅम्पियनशिप जिंकली. अंतिम सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ ने हरवले. रोमित पाल (५ व्या मिनिटाला), कर्णधार केतन कुशवाहा (१२ व्या मिनिटाला) आणि शाहरुख अली (१३ व्या मिनिटाला) यांच्या गोलांनी भारताचे आशियाई विजेतेपद निश्चित केले. या विजयामुळे भारतीय पुरुष संघ एलिट पूलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. (Indian Youth Hockey Team)



अचूक पासिंग आणि शिस्तबद्ध रणनीतीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात सुरुवातीलाच आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये रोमित पालने पाकिस्तानी गोलरक्षकाला चकवून पहिला गोल केला, ज्यामुळे मध्यंतरापर्यंत भारताला १-० अशी आघाडी मिळाली. दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला कर्णधार केतन कुशवाहाने (१२ व्या मिनिटाला) आणखी एक गोल करून भारताला मजबूत स्थितीत आणले. त्यानंतर लगेचच शाहरुख अलीने आणखी एक गोल करून ३-० अशी आघाडी मिळवून दिली. मोहम्मद उस्मानने १६ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे पाकिस्तानने पिछाडी कमी केली, परंतु भारतीय बचावफळीने शेवटच्या मिनिटांमध्ये भक्कम बचाव करत पुढील गोल होऊ दिले नाहीत.


 



 


अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी एफआयएच युथ हॉकी फाईव्ह्स विश्वचषकासाठी आधीच पात्रता मिळवली आहे. महिलांच्या गटात, भारतीय संघाला विजेतेपद गमवावे लागले आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात भारताला चीनकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला.एफआयएच युथ हॉकी फाईव्ह्स आशियाई चॅम्पियनशिपमधील प्रभावी कामगिरीनंतर भारतीय पुरुष आणि महिला संघांवर बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. हॉकी इंडियाने सुवर्णपदक विजेत्या भारतीय पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला ₹२,००,००० आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफ सदस्याला ₹१,००,००० चे बक्षीस जाहीर केले, तर रौप्यपदक विजेत्या भारतीय महिला संघाला प्रत्येक खेळाडूला ₹१,००,००० आणि प्रत्येक सपोर्ट स्टाफ सदस्याला ₹५०,००० मिळाले. (Indian Youth Hockey Team)

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून