Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या चिमुकल्याचा उपचारादरम्यान रेबीजमुळे पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच घटनेची चौकशी व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.(Dog Attack)



घटनेनंतर स्थानिक नगरसेवक राजकुमार पाटील यांनी मृत बालकाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी पालकमंत्री, महापालिका प्रशासन तसेच आमदार देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.याशिवाय, या प्रकरणाची गंभीर दखल घेत सोमवारी महापालिका आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेण्याची मागणी करण्यात येणार असून, संबंधित वैद्यकीय अधिकारी व विभागाकडून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे राजकुमार पाटील यांनी सांगितले.दरम्यान, शहर आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सोमवारी सकाळी १० वाजता मृत बालकाच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक या परिसरात कार्यरत असून, समर्थ स्वामीचा मृत्यू रेबीजमुळे झाल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला.



स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात जमलेल्या काही कुत्र्यांमध्ये भांडण सुरू असताना तेथे खेळत असलेल्या समर्थवर अचानक कुत्र्यांनी धाव घेतली. त्यावेळी एका कुत्र्याने त्याला चावा घेतल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले. तसेच चाव्यामुळे झालेल्या जखमेवर कुत्र्याने चाटल्याने रेबीजचा विषाणू शरीरात प्रवेश झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, पीडित कुटुंबाला न्याय व आर्थिक मदत द्यावी तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (Dog Attack)

Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी