Bank of Baroda : 'बँक ऑफ बडोदा'च्या एक टीबी डेटाची चोरी; ग्राहकांची माहिती, वैयक्तिक तपशील आणि कागदपत्रे डार्क वेबवर उपलब्ध

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील एक अग्रेसर आणि महत्त्वाची बँक असलेल्या 'बँक ऑफ बडोदा'चा (Bank of Baroda)तब्बल १ टीबी इतका प्रचंड आणि संवेदनशील डेटा चोरीला गेला आहे. हा सर्व चोरलेला डेटा आता डार्क वेबवर मोफत उपलब्ध करून देण्यात आला असून, यामध्ये बँक ग्राहकांची वैयक्तिक माहिती, खात्यांचे सविस्तर तपशील आणि अंतर्गत कागदपत्रांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.



हॅकर्सनी केलेल्या दाव्यानुसार, या १ टीबीच्या महाविशाल डेटाबेसमध्ये बँक ग्राहकांची अत्यंत संवेदनशील माहिती समाविष्ट आहे. यामध्ये प्रामुख्याने बचत खाती आणि चालू खात्यांचे सर्व रेकॉर्ड, ग्राहकांची कर्जाची माहिती आणि अर्ज, नेट बँकिंग युजरचे तपशील आणि वैयक्तिक ओळख कागदपत्रे, अनिवासी भारतीय आणि कॉर्पोरेट बँकिंग सेवांचे गोपनीय रेकॉर्ड, देशभरातील बँक शाखा आणि एटीएमशी संबंधित अंतर्गत कागदपत्रे आणि अहवाल याचा समावेश आहे. हा संपूर्ण डेटा सर्वप्रथम गेल्या शनिवार, म्हणजेच २६ जुलै रोजी 'ransomware.live' या डार्क वेब ट्रॅकिंग करणाऱ्या वेबसाईटवर निदर्शनास आला होता. त्यानंतर सायबर सुरक्षा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.



या गंभीर डेटा लीकच्या वृत्ताची दखल घेत बँक ऑफ बडोदने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर आपले अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे. बँक ऑफ बडोदने स्पष्ट केले आहे की, त्यांची मुख्य बँकिंग सिस्टीम पूर्णपणे सुरक्षित आहे. एका कर्मचाऱ्याचे ईमेल हॅक झाल्यामुळे हा डेटा लीक झाला. बँकेने तातडीने सुरक्षा उपाययोजना केल्या असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. सध्या बँकेकडून या प्रकरणाची सखोल आणि सर्वसमावेशक फॉरेन्सिक चौकशी सुरू असून, सर्व लागू नियामक नियमांनुसार संबंधित प्राधिकाऱ्यांशी आणि तपास यंत्रणांशी पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.



सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि डिजिटल हक्कवादी संस्था 'कॅशलेस कन्झ्युमर'चे संस्थापक श्रीकांत लक्ष्मणन यांनी डार्क वेबवर उपलब्ध झालेल्या या लीक डॅम्पमधील काही कागदपत्रांची प्राथमिक पाहणी केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये बँक शाखांचे ऑडिट रिपोर्ट्स, लोन अप्रेजल (Loan Approval) कागदपत्रे, अंतर्गत पत्रव्यवहार, सतर्कता तपासणी अहवाल आणि देशभरातील विविध शाखांमधील ग्राहकांच्या अर्ज अर्जांचा समावेश आहे. हा सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत गंभीर धक्का असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



सध्या तरी कोणत्याही अधिकृत हॅकर किंवा ग्रुपने या हल्ल्याची जाहीरपणे जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र, सायबर सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, 'ट्रिपलएक्स' नावाच्या एका तुलनेने नवीन आणि धोकादायक हॅकिंग ग्रुपचा यामागे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी याच 'ट्रिपलएक्स' ग्रुपने मे २०२५ मध्ये इंडोनेशियातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या 'पीटी बँक नेगारा इंडोनेशिया' वर असाच मोठा सायबर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात त्यांनी सुमारे २ टीबी डेटा चोरला होता, ज्यामध्ये कायदेशीर करार, वैयक्तिक ओळख तपशील, आर्थिक व्यवहारांचा इतिहास आणि अंतर्गत बँकिंग कागदपत्रांचा समावेश होता.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर