पत्नीविरोधात आरोप, 13 मिनिटांचा VIDEO अन् कोकणकड्यावरून उडी; गुजरातच्या तरुणाच्या मृत्यूने खळबळ

गुजरातमधील 24 वर्षीय तरुणाने महाराष्ट्रातील 1700 फूट उंच कोकणकड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. वैवाहिक वादामुळे निर्माण झालेल्या तणावातून ही आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातच्या भावनागरचा रहिवासी आणि टपाल कर्मचारी असलेल्या विश्वराजसिंह मयूरसिंह गोहिलने आत्महत्या करण्यापूर्वी 13 मिनिटांचा एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओत त्याने आपल्या विभक्त पत्नीला आणि तिच्या कुटुंबाला जबाबदार धरले होते.


विश्वराजचे आणि त्याच्या पत्नीचे लग्न 08 फेब्रुवारी 2026 रोजी झाले होते. पण अवघ्या आठ महिन्यांतच हे लग्न संपुष्टात आले. त्याच्या पत्नीने 12 सप्टेंबर रोजी घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती, ज्यासाठी तो 09 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात हजर झाला होता. व्हिडिओमध्ये त्याने वैवाहिक संघर्ष आणि सुरु असलेल्या कायदेशीर कार्यवाहीबद्दल आपली व्यथा व्यक्त केली. "आज मी हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्यावरून उडी मारून आत्महत्या करणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय घडलं? जेव्हा आयुष्यात काहीही उरत नाही, कोणतीही आशा उरत नाही... आणि जेव्हा एखादी चांगली गोष्ट किंवा नातेच दुःखाचे कारण ठरते, तेव्हा ते माणसाचा आत्मा पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकते... आपण म्हणतो की विवाह हे एक पवित्र नाते आहे, जे जन्मोजन्मी टिकायला हवे. पण आजच्या आधुनिक युगात, जेव्हा दोन व्यक्तींचे विचार, स्वभाव आणि सवयी एकमेकांशी जुळत नाहीत आणि त्यांच्यात वाद किंवा संघर्ष निर्माण होतात, तेव्हा लोक घटस्फोट घेतात," असे त्याने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.


त्याने आपल्या पत्नीवर आणि तिच्या कुटुंबावर अनेक आरोप केले. त्याने म्हटले की, त्यांच्यातील रोजच्या किरकोळ मतभेदांना तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी घरगुती हिंसाचार असे स्वरूप दिले आहे. तो म्हणाला, "असे वादळ निर्माण होईल, याची मला तेव्हा कल्पनाही नव्हती. माझ्या घरी अशी कोणतीही घटना घडलेली नाही, तरीही तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, मी, माझी आई आणि माझ्या भावाने माझ्या पत्नीला मारहाण केली. हे पूर्णपणे खोटे आणि बनावट आहे. एफआयआर (FIR) नोंदवताना पोलीस कोणताही पुरावा किंवा वैद्यकीय अहवालही मागत नाहीत." गोहीलने असा दावा केला की, "मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दबावामुळे त्याला मृत्यूला कवटाळण्यास भाग पाडले जात आहे." गोहीलच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीच्या पालकांनी तिला बळजबरीने त्याच्या घरातून ओढत नेले होते.



"त्यांचा दावा आहे की त्यांचे सोने आमच्याकडे आहे. पण सत्य हे आहे की, जेव्हा तिचे आई-वडील तिला बळजबरीने ओढत नेत होते, तेव्हा तिने स्वतःच सांगितले होते की तिला जायचे नाहीये. आमच्या परिसरातील लोक याचे साक्षीदार आहेत. ती आमचे दागिने घालूनच निघून गेली होती, पण जेव्हा आम्ही आमच्या वस्तू परत मागतो, तेव्हा कोणीही आमचे म्हणणे ऐकून घेत नाही किंवा त्यांच्यावर कोणताही दबाव टाकला जात नाही. सर्व दबाव केवळ मुलाच्या कुटुंबावरच टाकला जातो," असे त्यांनी सांगितले. "माझे सासरे मला म्हणायचे की ते माझ्या वडिलांसारखे आहेत. एखादा पिता आपल्या मुलाला लुटतो का? त्याच्या मानसिक स्थितीला हानी पोहोचवतो का? आणि त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करतो का? पिता तर उलट माफ करतो आणि मुलाला सुधारण्याची संधी देतो. आज, जेव्हा मी जीव देत आहे, तेव्हा माझ्या आई-वडिलांचे आणि माझ्या 16 वर्षांच्या लहान भावाचे काय होईल? माझ्या भावावरही घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


गोहील यांनी आपल्या शेवटच्या व्हिडिओमध्ये घरगुती हिंसाचार कायद्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "तुम्हाला माहीत आहे का की, आकडेवारीनुसार कलम ४९८-अ (घरगुती हिंसाचार) अंतर्गत दाखल होणाऱ्या प्रकरणांपैकी 90 ते 92 टक्के प्रकरणे खोटी आणि बनावट असतात? कोणत्याही पुराव्याशिवाय किंवा आधाराशिवाय, केवळ तोंडी आरोपांच्या आधारे या कायद्याचा गैरवापर केला जातो. जेव्हा हे 'शस्त्र' तरुणीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या हातात येते, तेव्हा त्याचा उघडपणे गैरवापर केला जातो. खटला सुरू होण्यापूर्वी तडजोडीचे प्रयत्न केले जातात, परंतु त्यातून पूर्णपणे सकारात्मक परिणाम मिळत नाहीत," असे त्यांनी म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, आजची तरुण पिढी विवाहाच्या कल्पनेनेच घाबरली आहे, कारण हा कायदा पूर्णपणे एकतर्फी आणि पक्षपाती वाटतो.


"जेव्हा अशी खोटी प्रकरणे दाखल केली जातात, तेव्हा पुरुषांची जी दयनीय अवस्था होते, त्याकडे प्रशासकीय आणि कायदेशीर यंत्रणांनी लक्ष दिले पाहिजे. मी भावनगरमधील सर्व अधिकारी आणि नागरिकांना आवाहन करतो की, कायद्यात बदल आणि सुधारणा घडवून आणाव्यात, जेणेकरून कलम ४९८-अ अंतर्गत दाखल होणाऱ्या खोट्या प्रकरणांमुळे निष्पाप तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही. मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत. मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे," असेही त्यांनी नमूद केले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांतील प्रचारतोफा उद्या थंडावणार, २३ ऑक्टोबरला मतदान; पाच जागांसाठी १८२ उमेदवार रिंगणात, २७ ऑक्टोबरला मतमोजणी

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकीच्या

KSBKBT2 off air: 'क्योंकि सास भी कभी बहू थी 2' संपला; स्मृती इराणी-एकता कपूर भावुक

‘क्योंकि सास भी कभी बही थी 2’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. स्मृती इराणी यांनी या मालिकेतून छोट्या

IND vs NZ: टीम इंडियाने न्यूझीलंडमध्ये जिंकले सर्वाधिक सामने, तरीही पहिल्या सामन्यात धाकधूक! असं का?

वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज

Nashik Crime : नाशिकमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार ! दहशतवादी प्रकरणात अडकवण्याची धमकी देत 71 लाखांची फसवणूक

Nashik Crime : काश्मीरमधील दहशतवादी प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करत अटक आणि मालमत्ता जप्तीची भीती दाखवून सायबर

'जेलर 2' मध्ये मोहनलालचा बॉडी डबल वापरल्याचे सत्य समोर; अखेर तो कलाकार आला समोर!

रजनीकांत यांच्या बहुचर्चित 'जेलर 2' चित्रपट रिलीज झाल्यापासूनच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

TVS Ntorq 150 चा हा 'डार्क' लूक तुफान धुमाकूळ घालणार, शोरूममध्ये दिसली नवी स्टाईल; लवकरच लॉन्च

TVS Ntorq : टीव्हीएस मोटर कंपनीच्या बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय फ्लॅगशिप पेट्रोल स्कूटरच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत