Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी भरलेला एक भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट दुभाजकाला (Divider) धडकून महामार्गावरच पलटी झाला. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकमधील शेकडो विटा महामार्गावर विखुरल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आहे.



चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला अपघात




मिळालेल्या माहितीनुसार, विटांची वाहतूक करणारा हा ट्रक नाशिकच्या दिशेने जात असताना घोटी–सिन्नर फाटा येथील उड्डाणपुलावर आला असता, अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन आदळला आणि मोठ्या आवाजासह रस्त्याच्या मधोमध पलटी झाला. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की, आसपासचे नागरिक आणि इतर वाहनचालक तातडीने मदतीसाठी धावले.



महामार्गावर विटांचा खच; वाहतूक विस्कळीत


ट्रक पलटी झाल्यामुळे त्यामध्ये असलेल्या हजारो विटा नाशिक–मुंबई महामार्गावर पसरल्या. यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र (घोटी) आणि घोटी पोलीस ठाण्याचे कर्मचारी व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.



पोलीस घटनास्थळी दाखल; एकेरी मार्गाने वाहतूक सुरू


पोलीसांनी घटनास्थळी पोहोचून सुरक्षेच्या कारणास्तव तत्काळ परिसराची नाकाबंदी केली आणि महामार्गावर विखुरलेल्या विटा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. वाहनांची लांबच लांब रांग लागू नये म्हणून पोलीसांनी वाहतूक दुसऱ्या बाजूने वळवून सध्या एकेरी (Single-lane) मार्गाने वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे. महामार्गावरून अपघातग्रस्त ट्रक आणि विटा बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू असून लवकरच दोन्ही मार्गिका पूर्णपणे मोकळ्या केल्या जातील, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jain Diksha Mahotsav : प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार; अहिंसा आणि जीवदयेचा विचार भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते. अहिंसा, त्याग, आत्मसंयम आणि जीवदया ही मूल्ये

Bharat Scouts and Guides : भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट

Bharat Scouts and Guides: ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या संघटनेच्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ST Bus Stand : राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार ! जेजुरीच्या धर्तीवर उभारणार दुमजली प्रसाधनगृहे

ST Bus Stand : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्यातील एसटी बसस्थानकांवर आता स्वच्छ आणि

Eknath Shinde : विनोद कांबळींच्या उपचारांसाठी एकनाथ शिंदेंचा पुढाकार ! दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारणार

Eknath Shinde : भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंज

Prahaar Marathi News Live, 29 November 2026 :- भारतीय संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, जुरेलचे शतक हुकलं

Prahaar Marathi News Live दिनांक 29 नोव्हेंबर 2026 च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या,