Nashik Accident News : नवविवाहित दांपत्याचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू

Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात भीषण रस्ता अपघातात नवविवाहित पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर पत्नीची बहीण गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरासह शैक्षणिक क्षेत्रातही शोककळा पसरली आहे. (Nashik Accident News)



नवविवाहित दाम्पत्यावर काळाचा घाला


कळवण (Kalwan) तालुक्यातील पिळकोस फाट्याजवळ रविवारी सकाळी सुमारे सव्वा आठच्या सुमारास नवविवाहित पती-पत्नीचा भीषण अपघात झाला. खामखेडा येथून पिळकोसच्या दिशेने जाणाऱ्या मॅक्झिमो प्रवासी वाहनाची आणि कळवणकडून सटाण्याच्या दिशेने दुचाकीवरून जात असलेल्या तिघांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दिनेश गावित, त्यांची पत्नी कीर्ती गावित आणि पत्नीची बहीण त्रिशा गावित गंभीर जखमी झाले. तिघांनाही तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात (Kalwan Sub-District Hospital) दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दिनेश गावित आणि कीर्ती गावित यांचा मृत्यू झाला. तर त्रिशा गावित यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. (Nashik Accident News)



शैक्षणिक क्षेत्रात शोककळा


मृत कीर्ती गावित या डांग सेवा मंडळ संचलित जनता विद्यालय, अभोणा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. तर दिनेश गावित हे जलसंपदा विभागात कर्मचारी होते. विशेष म्हणजे, अवघ्या दोन ते अडीच महिन्यांपूर्वीच या दोघांचा विवाह झाला होता. नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मूळगावी जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. (Nashik Accident News)


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे कळवण तालुक्यासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नवविवाहित दांपत्याच्या अकाली निधनाने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण