Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई:
भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती करणारे आणि १२ राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेले शैलेंद्र सिंग आता मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहेत. 'लाडू' या चित्रपटाच्या माध्यमातून ते पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
'बॉस एंटरटेनमेंट' आणि 'ब्रेडविनर प्रोडक्शन्स' प्रस्तुत हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये(Film festival)  प्रचंड गाजत आहे.



चित्रपटाची वैशिष्ट्ये:
९ अस्सल मराठी गाणी या चित्रपटात एकूण ९ गाणी असून ती या चित्रपटाच्या भावनिक प्रवासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. लवकरच या गाण्यांचा औपचारिक लाँच सोहळा पार पडणार आहे.


‘कांचीवरम’, ‘हनुमान’, ‘कॉर्पोरेट’ आणि ‘डोर’ यांसारख्या सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या चित्रपटांची निर्मिती करणारे, तसेच भारतातील पहिली पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतील कलाकृती भारतात प्रदर्शित करणारे शैलेंद्र सिंग(Shailendr singh) आपल्या या पहिल्या मराठी दिग्दर्शकीय प्रवासाविषयी म्हणतात, “मी ७२ चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि यापूर्वी काही चित्रपट दिग्दर्शितही केले आहेत, पण दिग्दर्शक म्हणून मी केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ राहील आणि तो माझ्यासोबत कायम राहील.


अभिनेते प्रदीप गोगटे खरोखरच विलक्षण आहेत – ते आपल्या निःशब्द अभिनयातून एका माणसाचं संपूर्ण आयुष्य या पडद्यावर उभं करतात.” या चित्रपटाची निर्मिती ‘बॉस एंटरटेनमेंट’ आणि ‘ब्रेडविनर प्रोडक्शन्स’ सह-निर्माती सोनिया नासेरी कोल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.


मुंबई, ठाणे आणि कर्जतच्या मातीवर कृष्ण-धवल (Black & White) स्वरूपात चित्रित झालेला हा १०३ मिनिटांचा मराठी चित्रपट मानवी संघर्षाची अत्यंत भावनिक आणि वास्तवावादी गाथा मांडतो. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पाठवला जात आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या