Virar Missing Girl : विरारमधील बेपत्ता अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाला नवे वळण, पोलिसांनी 'लव्ह जिहाद'चा दावा फेटाळला

विरार : विरारमधील अल्पवयीन मुलगी बेपत्ता (Missing) झाल्याच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. मुलगी एका तरुणासोबत जात असल्याचा दावा करणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. मुलीच्या नातेवाईकांसह काही हिंदू संघटना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा 'लव्ह जिहाद'चा ('Love Jihad') प्रकार असल्याचा आरोप केला आहे. मात्र, विरार पोलिसांनी हे आरोप फेटाळत मुलगी कौटुंबिक कारणांमुळे स्वतःहून घर सोडून गेली होती आणि या प्रकरणात कोणताही आरोपी नसल्याचे स्पष्ट केले आहे. (Virar Crime)



मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी 14 जुलैपासून बेपत्ता होती. तिच्या नातेवाईकांनी एका सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत मुलगी रिजवान नावाच्या तरुणासोबत जाताना दिसत असल्याचा दावा केला आहे. हे फुटेज पोलिसांनी नव्हे, तर स्वतः त्यांनी शोधून पोलिसांकडे दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. (Virar Missing Girl)

नातेवाईकांच्या आरोपानुसार, अनेक दिवस पोलीस ठाण्यात पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई झाली नाही. त्यानंतर काही हिंदू संघटनांनी स्वतंत्रपणे माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. एका सलून चालकाकडून माहिती मिळाल्यानंतर संबंधित तरुणाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मुलगी एका महिलेसोबत आढळल्याचा दावा करण्यात आला. संबंधित महिला आणि सलून चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. मात्र, चौकशीनंतर दोघांनाही सोडून देण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तसेच मुलीच्या वैद्यकीय तपासणीसही विलंब झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Palghar)



दुसरीकडे, विरार पोलिसांनी या सर्व आरोपांचे खंडन केले आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात मुलगी कौटुंबिक कारणांमुळे स्वतःहून घराबाहेर गेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात कोणताही आरोपी नसून 'लव्ह जिहाद'चा कोणताही संबंध आढळलेला नाही. तसेच सरकारी रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे वैद्यकीय तपासणीला विलंब झाल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Virar Police Station)

या प्रकरणात नातेवाईक आणि काही संघटनांकडून गंभीर आरोप करण्यात आले असले, तरी पोलिसांनी त्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती पुढील तपास आणि अधिकृत निष्कर्षानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

 
Comments
Add Comment

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी