Pune Crime : पुण्यात 1 कोटींच्या रकमेवर दरोड्याचा कट; दोन पोलिसांसह 10 जणांवर गुन्हा, 6 आरोपी फरार

पुणे: पुणे जिल्ह्यात 1 कोटी रुपयांच्या रोख रकमेवर डोळा ठेवून दरोड्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका तोतया पत्रकारासह चौघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित 6 आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. (Crime)



मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांनी ओळखीच्या व्यक्तीला आर्थिक व्यवहारासाठी 1 कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. 18 जुलै रोजी त्यांनी ही रक्कम दोन बॅगांमध्ये घेऊन सिंहगड रस्त्यावरील ठरलेल्या ठिकाणी पोहोचून ती कारमधून नऱ्हे येथील बँकेत नेण्यास सुरुवात केली.(Pune)


प्रवासादरम्यान अचानक एका दुचाकीने कार अडवली. त्यानंतर काही जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगत वाहनातील लोकांना धमकावले. "बेकायदेशीर पैसे घेऊन जात आहात," असे सांगून त्यांनी पैशांच्या बॅगा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत हर्षवर्धन पवार यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकल्याचाही आरोप आहे. (Robbery case)


या गोंधळानंतर संबंधित कार खेड शिवापूर पोलीस चौकीत नेण्यात आली. तेथे आशिष तिवारी नावाच्या एका व्यक्तीने स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत संबंधितांना ताब्यात घेतल्याचा दावा केला. तपासात तो तोतया पत्रकार असल्याचे समोर आले. (Crime Case)



या प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्री यांचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. तक्रारदाराला धमकावून त्याच्याकडील काही रक्कम बळकावण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि गायब झालेली रक्कम परत मिळाल्याची माहिती आहे. (Talegaon Dabhade)


तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणात पुरवणी गुन्हा दाखल केला. आतापर्यंत तोतया पत्रकार आशिष तिवारीसह चौघांना अटक करण्यात आली असून, दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह अन्य 4 आरोपी फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. (Khad Shivapur)


या घटनेमुळे पोलीस दलाच्या प्रतिमेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे