PMSBY : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, फक्त २० रुपयांत २ लाखांचा अपघात विमा

PMSBY : PMSBY म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, ही भारतातील एक सरकारी अपघात विमा योजना आहे जी अपघाती मृत्यू आणि अपंगत्वासाठी परवडणारे जोखीम संरक्षण प्रदान करते. वर्षाला केवळ २० रुपये प्रीमियम भरून २ लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळत असल्याने ही योजना सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे. प्रीमियमची रक्कम दरवर्षी १ जून रोजी किंवा त्यापूर्वी ऑटो-डेबिटद्वारे खात्यातून वजा केली जाते. विमा संरक्षणाचा कालावधी १ जून ते ३१ मे असा एक वर्षाचा असतो.



योजनेचे फायदे


अपघाती मृत्यू झाल्यास नामनिर्देशित व्यक्तीला २ लाख रुपये मिळतात.


दोन्ही डोळ्यांची कायमस्वरूपी दृष्टी जाणे किंवा दोन्ही हात अथवा दोन्ही पाय निकामी होणे, तसेच एका डोळ्याची दृष्टी आणि एका हाताचा किंवा पायाचा वापर
कायमचा गमावल्यास २ लाख रुपयांची मदत मिळते.


एका डोळ्याची कायमस्वरूपी दृष्टी जाणे किंवा एका हाताचा अथवा पायाचा वापर कायमचा गमावल्यास १ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.



योजनेची पात्रता काय ?


वय १८ ते ७० वर्षे असावे.


सहभागी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये वैयक्तिक बचत खाते असावे.


खातेदाराने ऑटो-डेबिटसाठी संमती दिलेली असावी.


वार्षिक प्रीमियम खात्यातून वजा होण्यासाठी पुरेशी रक्कम उपलब्ध असणे आवश्यक आहे.



विमा संरक्षण कधी संपते ?


सदस्याचे वय ७० वर्षे पूर्ण झाल्यानंतर.


बँक खाते बंद झाल्यास.


खात्यात प्रीमियम वजा होण्यासाठी पुरेशी शिल्लक नसल्यास.


एकापेक्षा जास्त खात्यांद्वारे नोंदणी केली असल्यास विमा संरक्षण कमाल २ लाख रुपयांपर्यंतच मर्यादित राहते.



अर्ज प्रक्रिया


ऑफलाइन / ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पद्धत :


संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज भरता येतो.


अथवा जनसुरक्षा पोर्टलवरून अर्ज डाउनलोड करून आवश्यक कागदपत्रांसह बँकेत जमा करता येतो.


https://jansuraksha.gov.in/Forms-PMSBY.aspx फॉर्म डाउनलोड करण्यासाठी


अर्ज मंजूर झाल्यानंतर विमा प्रमाणपत्र दिले जाते.


सहभागी बँकेच्या इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग सुविधेद्वारे, उपलब्ध असल्यास, योजनेत नोंदणी करता येते.



संपर्क :


राज्यनिहाय टोलफ्री क्रमांक -https://jansuraksha.gov.in/files/STATEWISETOLLFREE.pdf



महत्त्वाचे


वार्षिक प्रीमियम : २० रुपये


विमा संरक्षण : १ जून ते ३१ मे


कमाल विमा रक्कम : २ लाख रुपय


नागरिकांनी अत्यल्प प्रीमियममध्ये उपलब्ध असलेल्या या योजनेचा लाभ घेऊन स्वतःसह कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Gmail Storage : Google Photos आणि Gmail चे स्टोरेज फुल झाले? एकही रुपया खर्च न करता अशी रिकामी करा जागा

Gmail Storage: प्रत्येक Google अकाउंटसोबत 15 GB मोफत स्टोरेज मिळते. मात्र, हे स्टोरेज Google Drive, Google Photos आणि Gmail या तिन्ही सेवांसाठी

Bhuvan Bam : भुवन बामच्या अडचणी वाढल्या! गुजरातमधील विद्यापीठातील कार्यक्रमात अश्लील कृती केल्याचा आरोप; गुन्हा दाखल

Bhuvan Bam: प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमेडियन भुवन बाम एका नव्या वादात अडकला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील पारुल

BMC Health Policy : शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य योजनांचा लाभ, नागरी आरोग्य धोरणाचा मसुदा सार्वजनिक आरोग्य समितीसमोर सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) BMC Health Policy : निरोगी मुंबई आणि भविष्यकालीन सज्जतेसाठी मुंबई महानगरपालिकेने नागरी आरोग्य

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला