Seattle Food Festival Firing : सिएटलमधील लोकप्रिय फूड फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबाराचा थरार; परिसरात भीतीचे वातावरण

सिएटल : अमेरिकेतील सिएटल शहरात एका लोकप्रिय फूड फेस्टिव्हलदरम्यान झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बाइट ऑफ सिएटल (Bite of Seattle) फेस्टिव्हलमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना शहराच्या प्रसिद्ध स्पेस नीडल (Space Needle) स्मारकापासून अवघ्या एका ब्लॉक अंतरावर घडली. (Seattle Food Festival Firing)


सिएटल पोलिसांनी (Seattle police) दिलेल्या माहितीनुसार, सिएटल सेंटर परिसरात संध्याकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला. घटनेनंतर पोलिसांनी परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. (Seattle Food Festival Firing)



फेस्टिव्हलमध्ये अचानक माजली दहशत :


गोळीबाराच्या वेळी Bite of Seattle फेस्टिव्हल सुरू होता. या कार्यक्रमात शेकडो स्थानिक विक्रेते, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि लाईव्ह म्युझिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असताना अचानक गोळीबाराचा आवाज घुमला आणि काही क्षणांतच परिसरात गोंधळ उडाला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांनी ७ ते ८ गोळ्यांचे आवाज ऐकले. त्यानंतर लोकांनी जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धाव घेतली. गर्दी इतकी होती की अनेकांना हालचाल करणेही कठीण झाले होते. (Seattle Food Festival Firing)



गोळीबारानंतर घबराटीचे वातावरण :


एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गोळीबार सुरू होताच लोक एकमेकांना धडकत पळू लागले. संपूर्ण परिसरात काही वेळासाठी अराजक आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये गोळीबारानंतर नागरिकांची झालेली धावपळ आणि गोंधळ दिसून येत आहे. जखमींना तातडीने हार्बरव्ह्यू मेडिकल सेंटर (Harborview Medical Center) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून संपूर्ण घटनेचा तपास सुरू असून हल्लेखोर ताब्यात आहे की नाही, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. (Seattle Food Festival Firing)



३५ वर्षांहून अधिक जुना फेस्टिव्हल रक्तरंजित :


बाइट ऑफ सिएटल (Bite of Seattle) हा सिएटलमधील प्रसिद्ध वार्षिक फूड फेस्टिव्हल असून त्याची सुरुवात १९८२ मध्ये झाली होती. या तीन दिवसांच्या महोत्सवाला दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. मात्र यंदा उत्सवाच्या ठिकाणी झालेल्या गोळीबारामुळे आयोजक आणि नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. (Seattle Food Festival Firing)

Comments
Add Comment

पाकिस्तानमध्ये शाळेचे छत कोसळून भीषण दुर्घटना, 20 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू

पेशावर : पाकिस्तानमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात एका खासगी शाळेचे छत

Crime News: अमेरिकेत हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबाराचा कट उधळला; 19 वर्षीय तरुणाला अटक

अमेरिका : अमेरिकेतील शिकागो परिसरात हिंदू मंदिरावर सामूहिक गोळीबार करण्याचा कथित कट उधळण्यात आला आहे. या

इस्रायलचे नवे कठोर नियम, 31 देशांतील क्रू सदस्यांच्या प्रवेशावर निर्बंध; एअर फ्रान्सकडून पालनाला दुजोरा

तेलअवीव : फ्लाय दुबईच्या विमानाशी संबंधित अपहरणाच्या प्रयत्नानंतर इस्रायलने परदेशी विमान कंपन्यांसाठी

Germany Robot Viral Video : रोबोटकडून १६ वर्षांच्या तरुणीचा लैंगिक छळ; जर्मनीत खळबळ, पोलिसांनी रोबोटसह मोबाईल केले जप्त

कोलोन : जर्मनीतील कोलोन शहरात एका रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीचा रोबोटद्वारे अयोग्य स्पर्श आणि

विमान अपहरणाचा प्रयत्न? UAE मध्ये मालदीवचे 2 वैमानिक अटकेत; नेमकं प्रकरण काय?

अबुधाबी : दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणाऱ्या 'फ्लाय दुबई' (Flydubai) विमानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी आणि

धक्कादायक! फ्रान्समधील सुपरमार्केटच्या शेकडो फ्रिजवर सायबर हल्ला; अन्नाचा साठा गरम झाल्याने लाखो युरोंचे नुकसान

पॅरिस : फ्रान्समधील सुपरमार्केटवर झालेल्या एका अजब आणि भीषण सायबर हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामुळे