Nashik Crime News : 'शिवनाथ आयुर्वेद'चा परवाना कायमचा रद्द, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगांव येथील डॉ मोहन पुरी यांच्या शिवनाथ आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनी (Shivnath Ayurveda Products Company) नावाच्या औषध निर्मिती कंपनीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने कायमचा रद्द केला आहे. (Nashik Crime News)



अन्न व औषध प्रशासनाकडून छापा


डॉ. मोहन पुरी यांचे नाव संगमनेरजवळील वडगाव पान येथील कथित भोंदू राजेंद्र गडगेबाबा प्रकरणात सहआरोपी म्हणून समोर आले होते. गडगेबाबांच्या दरबारात बोगस औषधांचा पुरवठा केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. नाशिक येथील अन्न व औषध प्रशासनाने जायगांव येथे छापा टाकून प्रत्यक्ष तपासणी केली. या तपासणीत औषध निर्मितीचे निकष पाळले जात नसल्याचे, उत्पादन प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचे आणि औषध व प्रशासन कायद्यातील अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. (Nashik Crime News)



शिवनाथ आयुर्वेदाचा परवाना कायमचा रद्द


अन्न व औषध प्रशासनाने परवाना प्रकरणी कंपनीची बाजू जाणून घेतली तसेच वस्तुस्थितीचा आढावा घेतला. नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने ३० जून २०२६ रोजी अंतरिम आदेश पारित केला. त्यानुसार शिवनाथ आयुर्वेद प्रॉडक्ट कंपनीचा औषध निर्मिती परवाना कायमचा रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, डॉ. मोहन पुरी हे भोंदू राजेंद्र गडगेबाबांचे निकटवर्तीय असून विविध भोंदूबाबांना औषधांचा पुरवठा करत असल्याचा संशयही तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. 

Comments
Add Comment

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी नाशिक पोलिसांची तयारी, गोदाकाठावर रंगीत तालीम

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार

Saurabh Rajput Murder Case : सौरभ राजपूत हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा; निर्भया प्रकरणातील जल्लाद पवन यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Saurabh Rajput Murder Case: मेरठमधील सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मुस्कान रस्तोगी आणि साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु