Commonwealth Games 2026 : भारतीय खेळाडूंचा जलवा! शर्मिला धनखडच्या सुवर्णपदकासह राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात १० पदकांची भर

ग्लासगो : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2026) भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पदकांची लय कायम राखली आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताने अॅथलेटिक्स आणि पॅरा अॅथलेटिक्समध्ये एकाच दिवशी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत इतिहास रचला. भारताच्या खात्यात आता एकूण १० पदके जमा झाली असून, पदकतालिकेत भारत आठव्या स्थानावर आहे. (Sharmila Dhankar Wins Gold)



४० वर्षीय शर्मिला धनखडची संघर्षातून सुवर्णभरारी :


हरियाणाची ४० वर्षीय शर्मिला धनखड (Sharmila Dhankar Wins Gold) हिने पॅरा शॉटपुट स्पर्धेत ९.८१ मीटर गोळाफेक करत सुवर्णपदक पटकावले. तिचा हा विजय केवळ क्रीडा यश नाही, तर संघर्षावर मात करून मिळवलेले प्रेरणादायी यश ठरले आहे. घरगुती हिंसाचार, पतीपासून विभक्त होणे, आर्थिक अडचणी आणि सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, आया तसेच शेतमजुरी अशी विविध कामे करत शर्मिलाने आयुष्याशी दोन हात केले. अवघ्या सहा वर्षांत तिने स्वतःला आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाडू बनवत सुवर्णपदकावर नाव कोरले. (Commonwealth Games 2026)



शिल्पाने जिंकले कांस्य; भारताने रचला इतिहास :


याच पॅरा शॉटपुट स्पर्धेत कर्नाटकच्या शिल्पा शायला (Shilpa Shaila) हिने ७.२६ मीटर गोळाफेक करत कांस्यपदक जिंकले. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने पोडियमवरील दोन स्थानांवर कब्जा केला. (Commonwealth Games 2026)



सर्वेश आणि अजयाची रौप्य कामगिरी :


अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सर्वेश आणि अजया यांनीही उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदके पटकावली. त्यांच्या दमदार प्रदर्शनामुळे भारताच्या पदकसंख्येत मोठी भर पडली. (Commonwealth Games 2026)



आतापर्यंत भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत:


२ सुवर्णपदके,५ रौप्यपदके,३ कांस्यपदके अशी एकूण १० पदके जिंकली असून, भारतीय खेळाडूंची विजयी घोडदौड कायम आहे. भारतीय खेळाडूंच्या या दमदार कामगिरीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या आणखी पदकांच्या आशा वाढल्या असून, आगामी स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडूंकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Commonwealth Games 2026)




Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव