Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शिवसेनेच्या मंत्र्यांची शाळा

- तब्बल दोन तास चालली बैठक; रखडलेल्या विकासकामांबद्दल प्रश्नांचा भडिमार


मुंबई : राज्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासकीय कार्यक्षमतेवर भर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची मंगळवारी 'शाळा' घेतली. मंत्रालयातील समिती सभागृहात पार पडलेल्या या आढावा बैठकीत खातेनिहाय प्रलंबित प्रकल्प, निधीचा विनियोग आणि रखडलेल्या कामांच्या कारणांवरून उपमुख्यमंत्र्यांनी प्रश्नांचा भडिमार केला.



या बैठकीला शिवसेनेचे सर्व मंत्री आणि त्यांच्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) उपस्थित होते. 'विकसित महाराष्ट्र २०४७' या आराखड्यांतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टे (माईलस्टोन) आणि मागील दीड वर्षांत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा या वेळी घेण्यात आला. (Shiv Sena Ministers)


जनतेची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारींची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक खात्याच्या कामगिरीची बारकाईने चौकशी केली. कोणती कामे पूर्ण झाली, कोणती प्रलंबित आहेत आणि ती रेंगाळण्यामागे निधीचा तुटवडा आहे की प्रशासकीय दिरंगाई, याचा जाब त्यांनी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना विचारला. शेवटच्या टप्प्यात असलेल्या सर्व विकासप्रकल्पांना प्राधान्य देऊन ते तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.




कामात कुचराई करणाऱ्यांची गय नाही!


लोकाभिमुख कामे करताना निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देतानाच कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. राज्य सरकारच्या पायाभूत सुविधा आणि विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी सर्व मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी वेगाने पावले उचलावीत, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले. (Political News)

Comments
Add Comment

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला