IND VS SL : बीसीसीआयची मोठी घोषणा! श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; या खेळाडूचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात ऑगस्टमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) संघाची घोषणा केली आहे. अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला इंग्लंड दौऱ्यावर दुखापत झाली होती , यामुळे त्याची पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवड करण्यात आली नाही. जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.वॉशिंग्टन सुंदरला इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात दुखापत झाली होती, यामुळे तो श्रीलंका मालिकेला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या जागी भारतीय संघात पहिल्यांदाच ऑफ-स्पिनर सारांश जैनची निवड करण्यात आली आहे. (IND VS SL)



कोण आहे सारांश जैन (Saransh Jain)?


सारांश जैनचा पहिल्यांदाच भारतीय संघात समावेश करण्यात आले आहे. ३३ वर्षीय डावखुरा फलंदाज आणि उजव्या हाताचा ऑफ-स्पिन गोलंदाज असलेल्या सारांश जैनने एप्रिल २०१४ मध्ये मध्य प्रदेशकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने ५४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २७.८० च्या सरासरीने १८८ विकेट्स घेतले आहेत. फलंदाज म्हणून त्याने ३१.७५ च्या सरासरीने २२२३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. 'लिस्ट-ए' (List-A) क्रिकेटमध्ये सारांशने ४७ सामन्यांत ५५३ धावा केल्या आणि ३८ विकेट्स घेतल्या आहेत, तर २० टी-२० सामन्यांत त्याने १८ बळी आणि ३७ धावांची नोंद केली आहे. याच अष्टपैलू कामगिरीमुळे तो सातत्याने निवडकर्त्यांच्या नजरेत राहिला आहे.(IND VS SL)


 



 


भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्याचे वेळापत्रक


श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारतीय संघ कोलंबोत सात ऑगस्टपासून चार दिवसांचा सराव सामना खेळणार आहे.



कसोटी मालिकेचे वेळापत्रक - ऑगस्ट २०२६


पहिली कसोटी (गॅले) - १५ ते १९ ऑगस्ट


दुसरी कसोटी (कोलंबो)- २३ ते २७ ऑगस्ट



श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ


शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन* (फिटनेस चाचणीच्या निकालावर अवलंबून) , ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन

Comments
Add Comment

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन