Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे सावट! आज १९ जिल्ह्यांना यलो, तर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुसळधार सरींचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून, राज्यातील अनेक भागांवर काळे ढग दाटून आले आहेत. मंगळवारी (२८ जुलै) राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. १९ जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)


गेल्या काही दिवसांपासून राज्यात संमिश्र हवामानाचा अनुभव येत आहे. काही भागांत उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना, अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही दिवसही पावसाची सक्रियता कायम राहण्याचा अंदाज आहे.



कोकणात मुसळधार पावसाचा जोर :


कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरमध्ये हलका ते मध्यम, तर मुंबई आणि ठाण्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता :


पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Update)



उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस :


धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.



मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज :


छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



विदर्भात पावसाचा सर्वाधिक प्रभाव :


चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, येथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



हवामान विभागाचे नागरिकांना आवाहन :


वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी मेघगर्जनेच्या वेळी शेतातील कामे टाळावीत तसेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे. एकूणच, पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Monsoon Update)

Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी