PUC Certificate Validity : वाहनधारकांना मोठा दिलासा ! PUC सर्टिफिकेटची वैधता ३ वर्षांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा प्रस्ताव

नवी दिल्ली : वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी दरवर्षी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) घेण्याचे बंधन आतापर्यंत वाहनांवर होते. पण आता या नियमात बदल करण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय विचार करत आहे. यामुळे प्रदूषण कसे नियंत्रणात राहणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. पण दरवर्षी PUC करणाऱ्या वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.



नव्या BS-6 वाहनांसाठी PUC प्रमाणपत्राची वैधता सध्याच्या एका वर्षाऐवजी तब्बल तीन वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयात विचाराधीन आहे. हा नियम अमलात आल्यास नव्याने नोंदणी झालेल्या BS-6 वाहनांना पहिल्या नोंदणीच्या तारखेपासून सहा वर्षांपर्यंत दर तीन वर्षांनी PUC तपासणी करावी लागेल. त्यानंतर वाहन सहा ते दहा वर्षे जुने झाल्यास दर दोन वर्षांनी PUC नूतनीकरण बंधनकारक असेल. मात्र, १० वर्षांहून अधिक जुन्या BS-6 वाहनांसाठी दर सहा महिन्यांनी PUC तपासणी करावी लागणार आहे. याशिवाय, BS-4 वाहनांसाठी दर सहा महिन्यांनी PUC प्रमाणपत्र नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. तर BS-1, BS-2 आणि BS-3 वाहनधारकांना प्रत्येकी तीन महिन्यांनी PUC तपासणी करावी लागणार आहे. वाहनाचे वय आणि त्याचे उत्सर्जन मानक लक्षात घेऊन हे नियम लागू करण्याचा सरकारचा उद्देश आहे.


BS (Bharat Stage) उत्सर्जन मानके ही वाहनांमधून होणारे कार्बन मोनोऑक्साइड(carbon monoxide), नायट्रोजन ऑक्साइड(nytrogen oxide), हायड्रोकार्बन(hydrocarbon) आणि पार्टिक्युलेट मॅटर यांसारख्या प्रदूषकांचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लागू करण्यात आली आहेत. भारताने एप्रिल २०२० पासून थेट BS-6 मानके लागू केली असून, BS-5 टप्पा वगळण्यात आला होता. BS-6 वाहनांमुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होते आणि त्यासाठी कमी सल्फरयुक्त इंधनाचा वापर केला जातो. याबाबतच्या अंतिम अधिसूचना जारी करून नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा