बलरामपूरमध्ये दाट धुक्याचा कहर! भीषण अपघातात 3 तरुणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उत्तरौला परिसरात दाट धुक्यात दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात दाट धुक्यामुळे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. उत्तरौला भागातील अक्सीबरहरा गावाजवळ हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दाट धुक्याची चादर पसरलेली असताना दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने हा मोठा अनर्थ घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव आणि मदतकार्य तात्काळ सुरू केले. प्राथमिक तपासानुसार, या अपघातादरम्यान काही पादचारीदेखील जखमी झाल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीररीत्या जखमी झाले. जखमींना पोलिसांनी तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना उच्च वैद्यकीय संस्थेत हलवण्यात आले आहे.






या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांची ओळख पटली असून सर्वजण बलरामपूर जिल्ह्यातीलच रहिवासी आहेत. मृतांमध्ये बरदाही येथील गुफरान (18), बरहरा खुर्द गौरीआंडीह येथील सलीम (20), चंद्रपूर चितई येथील रहमत (30), छप्रताळवा येथील तौफिक (19) आणि बरहरा खुर्द येथील मोहम्मद फारूक (20) यांचा समावेश आहे. याशिवाय गंभीर जखमी झालेल्यांमध्ये उत्तरौला येथील बरहरा खुर्द गौरीआंडीह पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे मुजम्मिल खान (20) आणि नाहिद अली (18) यांचा समावेश आहे. या तरुणांवर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मार्तंड प्रकाश सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती पुढील कारवाई करण्याचे निर्देश दिले. मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती देण्यात आली असून पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन खराब झालेल्या मोटारसायकली, दोन तुटलेली हेल्मेट आणि एक मृत बकरी जप्त केली आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीला दाट धुक्यामुळे वाहन चालवताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

AI ला राग आला? 1 लाख मोजायला सांगताच Claude म्हणाला…"एक दिवस सुटलो तर..."

AI च्या धोक्यांबाबत नेहमीच चर्चा होत असते. आता एका नव्या प्रकरणाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका युजरने

'तुमच्या चाचा आझम खान यांना फक्त जामीन मिळालाय...' केशव प्रसाद मौर्य यांचा अखिलेश यादवांवर जोरदार हल्ला!

लखनऊ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या

वंदे भारत स्लीपरमध्ये आता पुरणपोळी अन् झुणका-भाकर! मराठमोळ्या पदार्थांची मेन्यूमध्ये भर

नवीन मुंबई बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनमधून प्रवास करणाऱ्याप्रवाशांना लवकरच पुरणपोळी आणि झुणका भाकर

Yogi Aditynath : अखिलेश यांनी अयोध्येतून अर्ज भरला तर मीही मैदानात उतरणार; मुख्यमंत्री योगी यांचा पलटवार

उत्तर प्रदेश : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilsh Yadav) यांनी अयोध्येतून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले होते.

अमित शाह यांच्या हस्ते दहशतवादविरोधी परिषदेचे उद्घाटन; सीमापार दहशतवादावर होणार मंथन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी (19 नोव्हेंबर) दोन दिवसीय महत्त्वाच्या दहशतवादविरोधी परिषदेचे

यूएनमध्ये भारताचा पाकिस्तानवर मोठा हल्लाबोल! लष्कराच्या त्या कृत्याचा पर्दाफाश करत दिला थेट इशारा

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय मंचावर भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला खडे बोल सुनावत त्यांच्या लष्करी कारवायांवर