Pune Crime : पुण्यात सिनेस्टाईल दरोडा ! कॅशिअरच्या डोळ्यात स्प्रे फवारत ८ लाखांची रोकड लंपास; सिंहगड रस्त्यावर खळबळ

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात रविवारी रात्री सिनेस्टाईल दरोड्याची धक्कादायक घटना घडली. मद्यविक्री दुकानातील दिवसाची आठ लाख रुपयांची रोकड घेऊन निघालेल्या कॅशिअरला चौघा अज्ञातांनी अडवून त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला. त्यानंतर मारहाण करत रोकड हिसकावून आरोपी दुचाकीवरून फरार झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नऱ्हे पोलिसांनी अज्ञात चौघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.



याप्रकरणी हौसकुमार प्रकाश इंगळे (वय ४२)यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंगळे हे नऱ्हे येथील एका मद्यविक्री दुकानात कॅशिअर म्हणून कार्यरत आहेत.रविवारी (२६ जुलै) रात्री सुमारे ११ वाजता ते दुकानातील दिवसभराची रोकड घेऊन दुचाकीवरून पिंपरीतील डांगे चौकाच्या दिशेने निघाले होते.


वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोहोचताच दोन दुचाकींवरून आलेल्या चौघा चोरट्यांनी त्यांचा रस्ता अडवला.आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारत त्यांना मारहाण केली.काही क्षणांतच रोकड असलेली बॅग हिसकावून आरोपी भरधाव वेगाने पसार झाले.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इंगळे यांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार,सहाय्यक पोलिस आयुक्त विजय कुंभार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले असून आरोपींच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण करत असून,आरोपींचा लवकरच शोध लागेल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी