Pune Univercity Fake Degree Racket: पुणे विद्यापीठात बनावट पदवीचं रॅकेट? उघड झाला धक्कादायक प्रकार

पुणे :  'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' म्हणून देशभरात ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नावावर बनावट पदवी प्रमाणपत्रे तयार करून देण्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार कोणत्याही यंत्रणेमुळे नव्हे, तर एका सामान्य रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.या प्रकरणाची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.(SPPU)



महेश कदम हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात माहिती घेण्यासाठी ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात(SPPU) गेले असताना,वित्त व लेखा विभागातील रमेश मुखेकर यांनी काही साथीदारांसह तब्बल तीन लाख रुपयांत बीकॉमची पदवी मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारानंतर कदम यांना बीकॉमचे पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.


मात्र, प्रमाणपत्रावर 'University of Pune' असे नाव असल्याचे पाहून कदम यांच्या मनात संशय निर्माण झाला. कारण विद्यापीठाचे अधिकृत नाव 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ'(SPPU) आहे. त्यातच वेगवेगळ्या वर्षांची आणखी चार पदवी प्रमाणपत्रे (Degree Certificate) दाखवण्यात आल्याने हा प्रकार संशयास्पद असल्याची त्यांची खात्री झाली.यानंतर महेश कदम यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती विद्यापीठ प्रशासनाला दिली. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.तसेच कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली.


तक्रार दाखल करूनही सुरुवातीला कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, जवळपास महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने रमेश मुखेकर आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात खातेअंतर्गत चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे विद्यापीठ(Univercity) प्रशासनाने स्पष्ट केले आहे.या कथित प्रकरणामुळे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशीतून नेमके सत्य काय समोर येते याकडे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक(education) क्षेत्राचे लक्ष लागले आहे .

Comments
Add Comment

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ४ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Ahilyanagar : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत अर्थात एसआयआर पडताळणीत जिल्ह्यातील तब्बल ४ लाख २६ हजार

POCSO arrest Shahapur : ठाण्याच्या शहापूर आदिवासी शाळेत २२ विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सो कायद्यांतर्गत नराधम मदतनीसाला अटक

Thane : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका शासकीय आदिवासी निवासी

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Eknath Shinde : ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Nashik : ...अन् बिबट्या थेट घरात शिरला, कुटुंबियांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Nashik : नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या एका बिबट्याने