Mahavitaran : महावितरणची राज्यभरात मोठी कारवाई, 3 दिवसांत 250 वीजचोरीची प्रकरणे उघड, 6.27 कोटींचा गैरवापर उघड

सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी राज्यातील विविध भागांत तपासणी करून ही कारवाई केली.

मुंबई  : राज्यात वीजचोरी आणि अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरणने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेत अवघ्या 3 दिवसांत वीजचोरीची 250 प्रकरणे उघडकीस आली आहेत. या कारवाईत एकूण 6 कोटी 27 लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश झाल्याची माहिती महावितरणने दिली आहे. सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकांनी राज्यातील विविध भागांत तपासणी करून ही कारवाई केली.






कोकणात 53, तर पुण्यात 73 प्रकरणे


महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने कोकण, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार प्रादेशिक विभागांत तपासणी केली. त्यामध्ये सर्वाधिक 73 प्रकरणे पुणे विभागात आढळली. तर इतर विभागांतील कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.




  • कोकण विभाग – 53 प्रकरणे

  • पुणे विभाग – 73 प्रकरणे

  • छत्रपती संभाजीनगर विभाग – 56 प्रकरणे

  • नागपूर विभाग – 68 प्रकरणे


या सर्व प्रकरणांचे मूल्यांकन करण्यात आले असून संबंधित ग्राहकांना 6 कोटी 27 लाख रुपयांची वीजचोरीची बिले देण्यात आली आहेत. निर्धारित मुदतीत बिल आणि दंडाची रक्कम न भरल्यास संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



240 जणांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई


या मोहिमेत 240 ग्राहकांविरुद्ध विद्युत कायदा 2003 मधील कलम 135 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे कलम वीजचोरीशी संबंधित आहे. तर अनधिकृत वीज वापराच्या 2 प्रकरणांत कलम 126 नुसार कारवाई करण्यात आली आहे.


वीजचोरीचे बिल आणि दंडाची रक्कम विहित मुदतीत न भरणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद दिली जाणार आहे. विद्युत कायद्यानुसार वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंडासह 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.



थकबाकीदारांच्या वीजजोडण्यांचीही तपासणी


थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या वीजजोडण्यांचीही सध्या तपासणी सुरू आहे. ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी केले आहे.


Comments
Add Comment

रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीरामांचा अपमान खपवून घेणार नाही, हिंदु जनजागृती समिती आक्रमक

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'रामायण' चित्रपटात मूळ कथेचा विपर्यास करून रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभू श्रीराम,

IAS officers Transfers : राज्यातील चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: राज्य शासनाने शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले.

Revenue Department : दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती आता आयकर विभागाला जाणार, महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिल्यास

सैनिकी शाळांतील प्रवेश आता केवळ गुणवत्तेच्या आधारेच; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील सैनिकी शाळांमध्ये पारदर्शक, उत्तरदायी आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्था निर्माण करण्यावर नव्या धोरणात भर

India Electric Ship : भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल जहाजाची महाराष्ट्रात यशस्वी चाचणी- मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती

मुंबई : जलवाहतुकीसाठी पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे

Pune Cyber Crime : विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर; पुण्यातील महिला डॉक्टरची 3 लाखांची फसवणूक

पुणे : सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात आहे. आता वरिष्ठ