Urban Development Department : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांवर आता एआय आणि 'जीओ टॅगिंगची' नजर - नगरविकास विभागाचा निर्णय

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ अधिवेशनात केलेल्या घोषणेची पूर्तता



मुंबई : महाराष्ट्रातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा) शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि गुणवत्ता आणण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विकासकामांचे तांत्रिक आणि सामाजिक लेखापरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय), जिओ-टॅगिंग आणि जीआयएस मॅपिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.



सन २०२६ च्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऑडिट टप्प्याटप्प्याने लागू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या आयुक्त तथा संचालकांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. यासंदर्भात बुधवारी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.



अनेकदा नागरी संस्थांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये दर्जाहीन कामे किंवा निधीचा गैरवापर झाल्याच्या तक्रारी येतात. मात्र, आता जिओ-टॅगिंग आणि ए आय सारख्या तंत्रज्ञानामुळे कामाच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवता येणार आहे. यामुळे विकासकामांचा दर्जा सुधारेल आणि कामांमध्ये पारदर्शकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



असे होणार हायटेक ऑडिट



  • या नव्या प्रणालीनुसार विकासकामांच्या तपासणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) व जीआयएस मॅपिंगचा वापर केला जाईल. तसेच कामाचा दर्जा आणि अचूकता तपासण्यासाठी एआयचा वापर केला जाईल.

  • प्रत्यक्ष कामाची प्रगती आणि ते वेळेत पूर्ण होत आहे का, यावर ऑनलाइन नजर ठेवली जाईल. या ऑडिट प्रक्रियेत केवळ सरकारी अधिकारीच नाही, तर नागरिक, रहिवासी संघटना, स्वयंसेवी संस्था, तांत्रिक तज्ज्ञ, शैक्षणिक संस्था आणि लोकप्रतिनिधींचा सहभाग निश्चित केला जाईल.

  • यासंदर्भात स्थापन करण्यात आलेली समिती १ महिन्याच्या आत शासनाला अहवाल सादर करेल त्यामध्ये सध्या सुरू असलेल्या तांत्रिक व वित्तीय ऑडिट पद्धतीत अधिक सुधारणा सुचवणे.

  • कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे अचूक लेखापरीक्षण करण्यासाठी शिफारशी करणे. विकासकामांचा नागरिकांना मिळणारा प्रत्यक्ष फायदा आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम अभ्यासणे.

  • चालू असलेली व प्रस्तावित विकासकामे वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण व्हावीत यासाठी ठोस उपाययोजना सुचवणे, आदी कामे या माध्यमातून केली जातील.

Comments
Add Comment

Nalasopara Sexual Abuse Case : नालासोपाऱ्यात खळबळ : डेटिंग ॲप्सचा वापर करून तरुणींचे शोषण करणाऱ्या आरीफ शेखवर गुन्हे दाखल

नालासोपारा : नालासोपाऱ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून

मुंबई महानगर प्रदेशात प्रवासाचा वेळ ५९ मिनिटांवर आणण्याचे लक्ष्य - महानगर आयुक्त संजय मुखर्जी

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी २०४७ पर्यंत ८० पायाभूत प्रकल्प राबविण्याचे नियोजन

BMC Tankers : मुंबई महापालिकेच्यातीबतीने आणखी २२ टँकरची खरेदी, आता मुंबईत धावणार महापालिकेचे आणखी टँकर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता १० टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय

Worli Koliwada : वरळी कोळीवाड्यातील सर्व अनधिकृत झोपड्या तोडा, स्थायी समिती अध्यक्षाचे प्रशासनाला निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) वरळी कोळीवाड्यातील समुद्र किनाऱ्यांवरील स्वच्छता आता करण्यात येणार असून याबाबतचा

BMC Versova Project : वर्सोवा मलजल प्रक्रिया केंद्राच्या कामाला मार्च २०२७ ची डेडलाईन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरातील पर्यावरण संरक्षण आणि किनारपट्टीच्या पाण्याचा दर्जा सुधारण्याच्या

BMC Road Work : आता वारंवार चर खणल्याने रस्त्यांचे होणारे नुकसान होणार कमी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत नव्याने बनवलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांवर विविध उपयोगिता जाळे अर्थात