Eknath Shinde : ठाण्यातील आनंद आश्रमात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट


ठाणे :- तमाम शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रमात आज मोठ्या उत्साहात आणि आनंदात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत गुरुपौर्णिमा साजरी केली.



शहरातील आनंदआश्रम येथे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. यानंतर त्यांनी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या खोलीत जाऊन त्यांच्या वापरातील वस्तूंवर फुले वाहून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. यानंतर तमाम शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.



तत्पूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावरही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याची फुले देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना उपनेते प्रकाश पाटील, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन समिती अध्यक्ष विलास जोशी, नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, ठाणे जिल्हा महिला संघटिका सौ. मीनाक्षी शिंदे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि शिवसेनेचे ठाण्यासह संपूर्ण राज्यभरातून आलेले प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'