Fast bowler Justin Greaves : जस्टिन ग्रीव्हसचा ऐतिहासिक पराक्रम, पण मराठमोळ्या बापू नाडकर्णींचा ६२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम आजही अभेद्य!

मुंबई : वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्हस (Fast bowler Justin Greaves) याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इतिहास रचत सलग पाच मेडन षटके टाकत प्रत्येक षटकात एक अशी एकूण पाच विकेट्स घेत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. तब्बल १४९ वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. (Fast bowler Justin Greaves)


सामन्याच्या सुरुवातीला ग्रीव्हसची गोलंदाजी प्रभावी वाटत नव्हती. त्याच्या पहिल्या सहा षटकांत २७ धावा झाल्या होत्या आणि एकही विकेट मिळाली नव्हती. मात्र त्यानंतर त्याने अफलातून पुनरागमन करत सलग पाच मेडन षटके टाकली आणि प्रत्येक षटकात एक विकेट घेत पाकिस्तानचा डाव उद्ध्वस्त केला. अखेरीस त्याचे आकडे ११ षटके, ५ मेडन, २७ धावा आणि ५ विकेट्स असे राहिले. (Fast bowler Justin Greaves)



मात्र 'मेडन ओव्हर'चा खरा बादशाह ठरला मराठमोळा बापू नाडकर्णी :


ग्रीव्हसच्या (Fast bowler Justin Greaves) विक्रमाची जगभर चर्चा होत असली तरी कसोटी क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक मेडन षटके टाकण्याचा विश्वविक्रम आजही भारताचे माजी डावखुरे फिरकीपटू आणि मुंबईचे सुपुत्र बापू नाडकर्णी यांच्या नावावर कायम आहे. १९६४ साली इंग्लंडचा भारत दौरा सुरू असताना चेन्नई (तेव्हाचे मद्रास) येथे झालेल्या कसोटीत बापू नाडकर्णी यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरशः धावांसाठी झगडायला लावले. त्यांनी सलग २१ मेडन षटके टाकत तब्बल १३१ चेंडूंवर एकही धाव दिली नाही. हा विक्रम आजही कसोटी क्रिकेटमध्ये अभेद्य मानला जातो.



३२ षटकांत फक्त ५ धावा; पण विकेट नाही :


त्या डावात बापू नाडकर्णी यांनी एकूण ३२ षटके गोलंदाजी केली. त्यापैकी तब्बल २७ षटके मेडन होती. उर्वरित पाच षटकांतही त्यांनी केवळ प्रत्येकी एक धाव दिली. म्हणजे संपूर्ण स्पेलमध्ये त्यांनी फक्त ५ धावा खर्च केल्या. विशेष म्हणजे इतकी किफायतशीर गोलंदाजी करूनही त्यांना एकही विकेट मिळाली नाही. त्यांचा त्या डावातील ०.१५ इकॉनॉमी रेट हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एका डावातील सर्वोत्तम गोलंदाजी इकॉनॉमी म्हणून आजही नोंदला जातो. (Fast bowler Justin Greaves)



४१ कसोट्यांमध्ये दमदार कारकीर्द :


१९५५ मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या बापू नाडकर्णी यांनी १९६८ पर्यंत ४१ कसोटी सामने खेळले. या काळात त्यांनी ८८ विकेट्स घेतल्या, तर त्यांचा संपूर्ण कारकिर्दीतील इकॉनॉमी रेट अवघा १.६७ इतका होता. २५ हून अधिक कसोटी सामने खेळलेल्या गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे ट्रेव्हर गोडार्ड (१.६४) यांच्यानंतर हा दुसरा सर्वोत्तम इकॉनॉमी रेट आहे. याच इंग्लंड दौऱ्यात कानपूर कसोटीतही नाडकर्णी यांनी १४ षटकांत ११ मेडन टाकत केवळ ३ धावा दिल्या होत्या. त्यांचा ०.२१ इकॉनॉमी रेट हा कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात किफायतशीर स्पेल मानला जातो. (Fast bowler Justin Greaves)



गोलंदाजच नव्हे, तर उपयुक्त फलंदाजही :


मुंबईत जन्मलेल्या बापू नाडकर्णी यांनी फलंदाजीतही आपली छाप सोडली. त्यांनी ६७ कसोटी डावांत १,४१४ धावा करत एक शतक आणि सात अर्धशतके झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावावर ८,८८० धावा आणि ५०० विकेट्स अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदली आहे. १७ जानेवारी २०२० रोजी मुंबईमध्ये त्यांचे निधन झाले. मात्र कसोटी क्रिकेटमधील सलग २१ मेडन षटकांचा त्यांचा विश्वविक्रम आजही कायम असून, क्रिकेट इतिहासातील सर्वात किफायतशीर गोलंदाजीच्या कामगिरींपैकी एक म्हणून त्याची नोंद घेतली जाते. (Fast bowler Justin Greaves)

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून