ICC Cricket World Cup 2027 : आयसीसी वर्ल्ड कप २०२७ मध्ये होणार मोठे बदल? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली मोठी मागणी

मुंबई : आयसीसी वर्ल्ड कप २०२७ सुरू होण्यासाठी अजून खूप वेळ असला , तरी स्पर्धेच्या स्वरुपावरून क्रिकेट विश्वात चर्चा रंगली आहे. वर्ल्ड कप २०२७ दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. आयसीसीने नव्या स्पर्धा स्वरुपाची घोषणा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँ मॅकडोनाल्ड यांनी आयसीसीशी मागणी केली आहे की, वर्ल्ड कप २०२७ साठी १५ ऐवजी १७ खेळाडूंचा संघ ठेवण्याची परवानगी देण्यात यावी.



वर्ल्ड कप २०२७ चा नवीन फॉर्मेट


आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या फॉर्मेटनुसार एखादा संघ फेरीपर्यंत पोहोचला तर त्याला तब्बल १५ सामने खेळावे लागतील. इतक्या मोठ्या स्पर्धेत खेळाडूंना दुखापत, खेळपट्टीतील बदल आणि विविध परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे केवळ १५ खेळाडूंचा संघ अपुरा ठरू शकतो, असे मॅकडोनाल्ड यांचे मत आहे. त्यांच्या मते, १७ खेळाडूंचा संघ असल्यास संघ व्यवस्थापनाला विविध परिस्थितीनुसार संघरचना बदलण्याची अधिक संधी मिळेल आणि दुखापतींमुळे संघाची ताकद कमी होणार नाही. (ICC Cricket World Cup 2027)



अँड्रू मॅकडोनाल्डचे स्पष्टीकरण


या मागणीबाबत बोलताना अँड्रू मॅकडोनाल्ड म्हणाले, "कोणतीही स्पर्धा खेळताना तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या खेळाडूंशिवाय मैदानात उतरायचे नसते. सर्वोत्तम खेळाडू संपूर्ण स्पर्धेत उपलब्ध राहावेत, ही प्रत्येक संघाची इच्छा असते." ते पुढे म्हणाले की, १७ खेळाडूंच्या संघाला परवानगी मिळाल्यास निवड समिती सर्वोत्तम १७ खेळाडूंची निवड करू शकेल. एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास किंवा खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार बदल करण्याची वेळ आल्यास संघाची गुणवत्ता फारशी कमी होणार नाही. मॅकडोनाल्ड यांनी या नवीन फॉर्मेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते या फॉर्मेटमुळे देशांना फारच कमी संधी मिळणार आहेत. (Andrew McDonald)

Comments
Add Comment

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला