Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी विद्यार्थी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू

Nashik Simhastha Kumbh Mela : नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थेमध्ये स्वतंत्र 'कुंभ कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 'कुंभदूत' या विद्यार्थी स्वयंसेवक उपक्रमासाठी ऑनलाइन नोंदणीही सुरू करण्यात आली आहे.नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा कुंभमेळा यशस्वी पद्धतीने संपन्न व्हावा यासाठी प्रशासनाकडून विविध विकासकामे मोठ्या जोमात सुरु आहे. अशातच कुंभमेळ्यासाठी विद्यार्थी स्वयंसेवकांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये स्वतंत्र 'कुंभ कक्ष' स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच 'कुंभदूत' या विद्यार्थी स्वयंसेवक उपक्रमासाठी ऑनलाइन नोंदणीही सुरू करण्यात आली असून इच्छुक विद्यार्थ्यांना QR कोड स्कॅन करून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



विविध विषयावर बैठकीत चर्चा


कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सिंहस्थाच्या काळात प्रशिक्षित स्वयंसेवकांची सक्षम यंत्रणा उभी करणे, विद्यार्थ्यांचा सामाजिक सहभाग वाढवणे आणि शैक्षणिक संस्थांशी प्रभावी समन्वय साधणे, यावर बैठकीत भर देण्यात आला.



प्रत्येक महाविद्यालयात स्थापन होणार 'कुंभ कक्ष'


प्रत्येक महाविद्यालयात सुरू होणारा 'कुंभ कक्ष' हा कुंभमेळा प्राधिकरण आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वयाचा दुवा म्हणून काम करणार आहे. या कक्षामार्फत विद्यार्थी स्वयंसेवकांची नोंदणी, प्रशिक्षण, स्वच्छ आणि हरित कुंभ अभियान, घाट, मंदिरे, रेल्वे स्थानके, वाहनतळ, आरोग्य केंद्रे आणि मदत शिबिरांमध्ये स्वयंसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच गर्दी आणि रांग व्यवस्थापन, माहिती केंद्रांचे संचालन, प्लास्टिकमुक्त उपक्रम, डिजिटल स्वयंसेवा, समाजमाध्यमांद्वारे जनजागृती आणि एनएसएस, एनसीसीसह विविध विद्यार्थी संघटनांशी समन्वय साधण्याची जबाबदारीही या कक्षावर असेल. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात येणार आहेत.



QR कोड स्कॅन करून ऑनलाइन नोंदणी


'कुंभदूत' उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेला QR कोड स्कॅन करून ऑनलाइन नोंदणी करायची आहे. नोंदणीदरम्यान विद्यार्थ्यांनी आवश्यक वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक संस्थेचा तपशील भरायचा असून, त्यानंतर संबंधित महाविद्यालयाच्या 'कुंभ कक्ष' आणि कुंभमेळा प्राधिकरणामार्फत पुढील प्रशिक्षण व स्वयंसेवक नियोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांचे नाव, पदनाम, दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल तपशील लवकरात लवकर कुंभमेळा प्राधिकरणाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



याबाबत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह म्हणाले, "नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या यशस्वी आयोजनात विद्यार्थी स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. प्रत्येक शैक्षणिक संस्थेत 'कुंभ कक्ष' स्थापन झाल्याने स्वयंसेवकांचे नियोजन, प्रशिक्षण आणि समन्वय अधिक प्रभावीपणे करता येईल. राष्ट्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व असलेल्या या पर्वासाठी शैक्षणिक संस्थांचे सहकार्य पूर्वीप्रमाणेच लाभेल, असा विश्वास आहे."

Comments
Add Comment

Supreme Court : नीट आंदोलकांवरील गुन्हे सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द; सीजेपीचे ५ सप्टेंबरचे आंदोलन रद्द

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आपल्या विशेष 'अनुच्छेद १४२' अंतर्गत अधिकारांचा वापर करत नीट २०२६

CM Devendra Fadnavis : आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्यांत करावी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अधिसंख्य पदांवरील कर्मचाऱ्यांची माहिती दोन आठवड्यांत सादर करण्याचे

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऐतिहासिक बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी

बिश्केक : २६ व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेत मंगळवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

BJP-MNS Clash : माहिममध्ये भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हटवण्यावरून वाद

दादरमध्ये तणाव, कार्यकर्त्यांची धरपकड मुंबई : पुण्यात शासकीय महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो