Vanita Kharat : चाळीतील खिडकीतून पाहिलेलं स्वप्न पूर्ण! नवऱ्याच्या सरप्राइजने अभिनेत्री झाली भावूक; 'ताज' मध्ये ग्रँड बर्थडे सेलिब्रेशन

मुंबई: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) हिने नुकताच आपला वाढदिवस अत्यंत खास पद्धतीने साजरा केला आहे. मुंबईतील वरळी कोळीवाड्यातील एका साध्या चाळीतून सुरू झालेला तिचा प्रवास आज एका स्वप्नवत टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बालपणी ज्या आलिशान 'ताज लँड एण्ड्स' हॉटेलकडे ती लांबून कौतुकाने पाहायची, त्याच हॉटेलमध्ये तिच्या नवऱ्याने तिचा वाढदिवस(Birthday) साजरा करत तिला एक अविस्मरणीय सरप्राइज दिले आहे.



'कोळीवाड्याच्या रेखा च 'ताज' मधील बर्थडे सेलिब्रेशन :


वरळीच्या कोळीवाड्यात जन्मलेल्या वनिताला तिचे चाहते प्रेमाने 'कोळीवाड्याची रेखा' म्हणूनही हाक मारतात. चाळीतील छोट्याशा घरात राहून तिने अभिनयाची मोठी स्वप्ने पाहिली होती. तिच्या घरासमोरच 'ताज लँड एण्ड्स' हे आलिशान हॉटेल दिमाखात उभे होते. बालपणी रोज त्या हॉटेलकडे पाहताना, 'एक दिवस आपणही तिथे जाऊ' असं एक सुंदर स्वप्न तिच्या मनात तयार झाले होते. आज तेच स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याने वनिता अत्यंत भावूक झाली आहे.


ताजच्या खिडकीतून दाखवले बालपणीचे घर :


वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या सेलिब्रेशनचा एक अत्यंत खास व्हिडिओ शेअर केला आहे.





या व्हिडिओमध्ये ती ताजच्या खिडकीजवळ उभी राहून समोर दिसत असलेल्या वरळी कोळीवाड्याच्या दिशेने हात दाखवताना दिसते.आपला आनंद व्यक्त करताना ती व्हिडिओमध्ये म्हणते:"तिथे समोर माझं घर आहे, ज्या चाळीत मी वाढलेय. आता धुकं आहे त्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये, मी लहानपणापासून हे ताज बघतेय. आज मी माझा वाढदिवस याच ताजमध्ये सेलिब्रेट करतेय... बापरे!"



सुमितच्या सरप्राइजने वनिता झाली आनंदित :


वनिताचा पती सुमित याने तिच्या या बालपणीच्या स्वप्नाची आठवण ठेवून अत्यंत गुप्तपणे हे सरप्राइज प्लॅन केले होते. याबद्दल पतीचे आभार मानताना वनिताने सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट लिहिली आहे.


ती लिहिते:
"सुमित, आयुष्यातला हा सर्वात अविस्मरणीय वाढदिवसाचं सरप्राइज दिल्याबद्दल आणि इतकं सुंदर सेलिब्रेशन(Celebration) प्लॅन केल्याबद्दल तुझे मनापासून आभार. प्रत्येक क्षण प्रेम, आनंद आणि हास्याने भरलेला होता. किती सरप्राइज मिळालं याची मोजदादच राहिली नाही, प्रत्येक क्षण तू जादुई करून टाकलॉस. काही वाढदिवस फक्त साजरे होतात, पण काही कायमच्या आठवणी बनून मनात जपले जातात; हा वाढदिवस त्यापैकीच एक आहे. मला इतकं खास आणि नशीबवान असल्याची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद."





सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव :


वनिताचा हा व्हिडिओ आणि तिची ही भावूक(Emotional) पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका साध्या कुटुंबातून येऊन स्वकर्तृत्वावर इथपर्यंत पोहोचलेल्या वनिताच्या या प्रवासाचे तिचे चाहते, मराठी कलाविश्वातील कलाकार आणि नेटकरी मनापासून कौतुक करत असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Comments
Add Comment

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण

KHK 2026: धकधक गर्लचा नवा अंदाज! 'कोण होणार करोडपती'च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

मुंबई : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'धक-धक गर्ल' म्हणून ओळखली जाणारी माधुरी दीक्षित सध्या 'कोण होणार करोडपती'

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

‘पुन्हा नक्की भेटू’ २३ ऑक्टोबरला रंगभूमीवर; नाटकाच्या निमित्ताने मुक्ता आणि मीरा यांची नाट्यक्षेत्रात नवी भरारी

काही नाती काळाच्या ओघात अधिक घट्ट होतात, तर काही नाती नव्या सर्जनशील वाटा खुल्या करतात ज्या नवरात्रीत देवीच्या

Salman Khan : ‘तू असा ड्रेस घालून...’; करिश्मा कपूरच्या ड्रेसवर सलमान खानने घेतला होता आक्षेप, Video Viral

Salman Khan-Karisma Kapoor: बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या जुन्या आठवणींना ‘कॉफी विथ करण’च्या

Chikeezing Movie Teaser: बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘चिकीझिंग’चा टीझर प्रदर्शित, 19 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Chikeezing Movie Teaser : बालपणातील निरागस आठवणी, मोठी स्वप्ने आणि ती पूर्ण करण्याची जिद्द यांचा सुंदर संगम असलेला ‘चिकीझिंग’