Devendra Fadnavis : 'म्हाडा'मध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा

गृहनिर्माण क्षेत्रात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यास तत्वतः मान्यता


मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (Mhada) बांधकाम आणि पुनर्विकासाबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रासह राज्यात विकासाचे आणि गृहनिर्माणाचे विविध प्रकल्प सुरू असून यात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यास त्यांनी तत्वतः मान्यता दिली.(Devendra Fadnavis)



म्हाडाचे राज्यातील विविध प्रकल्प आणि योजनांच्या कामांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, म्हाडामार्फत सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात सर्वसामान्यांसाठी मुबलक प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत. हे सर्व प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करावेत. बीडीडी चाळीसारख्या ज्या पुनर्वसन प्रकल्पांमध्ये रहिवाशांचे स्थलांतर करणे अपेक्षित आहे ते तातडीने करून प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी. कामाठीपुरा येथील महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या प्रक्रियेला गती देताना पूल, रस्ते आदी कामांची व्यवहार्यता विचारात घेऊन जोडरस्ते वाढविण्याबाबत विचार करावा, असे त्यांनी सांगितले.



एमएमआर क्षेत्रात म्हाडामार्फत एकूण तीन लाख ७० हजार कोटींच्या १५ विविध प्रकल्पांची कामे सुरू असून या समूह पुनर्विकास प्रकल्पातून एकूण दोन लाख १५ हजारांहून अधिक सदनिका निर्माण होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. ही सर्व कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार करावीत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास प्रकल्पाचे काम म्हाडामार्फत करण्यात येणार असून येथे पहिल्या टप्प्यात समाधी आणि मंदिराच्या कामास तसेच दुसऱ्या टप्प्यात पालखी मार्ग तयार करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभ्युदय नगर, जीटीबी नगर, मोतीलाल नगर, आदर्श नगर, वरळी; वांद्रे रिक्लेमेशन; एसव्हीपी नगर, अंधेरी; कामाठीपुरा, मध्य दक्षिण मुंबई; रामकृष्ण नगर, खार; ओल्ड एमएचबी कॉलनी, बोरिवली; भारतनगर, वांद्रे पूर्व; आराम नगर, वर्सोवा; प्लॉट नंबर सात आणि आठ, वांद्रे; पत्राचाळ, आर १० गोरेगाव; चारकोप, बोरिवली; आणि गोराई, बोरिवली या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. (Devendra Fadnavis)

Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे