Ajinkya Rahane : जे अनेक दिग्गजांना जमले नाही, ते अजिंक्यने करून दाखवले; अजिंक्यच्या कर्णधारपदाची अविस्मरणीय कामगिरी

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये अजिंक्य राहणेचा पर्व आता संपुष्टात आले आहे. अजिंक्य राहणेने ३८ व्या वर्षी क्रिकेटच्या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आज ३० जुलै २०२६ रोजी त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली.अजिंक्य रहाणेने आपल्या पोस्टमधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील चाहत्यांचे मनापासून आभार मानले. मागील तीन वर्षांपासून भारतीय संघातून वगळल्यानंतर, राहणेने देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघात पुनरागमनाचा प्रयत्न केला, परंतु त्याला वारंवार अपयश आले. त्याने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना जुलै २०२३ मध्ये खेळला होता. या काळात त्याने आयपीएलमध्ये सातत्याने धावा केल्या आणि कोलकात नाईट रायडर्स संघाचे नेतृत्वही केले.



अजिंक्य राहणेची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी


अजिंक्य राहणेने भारतासाठी आतापर्यंत ८५ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३८ च्या सरासरीने ५०७७ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कसोटी करियरमध्ये १२ शतक आणि २६ अर्धशतकही केले आहेत. यात लॉर्ड्स, मेलबर्न आणि वेलिंग्टनसारख्या ऐतिहासिक मैदानांवरील शतकांचा समावेश आहे. त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना २०१८ मध्ये आणि शेवटचा टी-२० सामना २०१६ मध्ये खेळला होता. (Ajinkya Rahane )






 

कर्णधार म्हणून अविस्मरणीय कामगिरी


अजिंक्य राहणेने धरमशाल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केले आणि आठ विकेट्सने सामना जिंकत २-१ ने मालिका जिंकली . त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकली होती. त्या मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर , नियमित कर्णधार विराट कोहली भारतात परतला होता. त्यावेळी अजिंक्य राहणेला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावेळी अनेक भारतीय खेळाडू दुखारपतग्रस्त झाल्यामुळे, संघाला नेट गोलंदाजांनाही संधी द्यावी लागली होती. अश्या कठीण परिस्थितीतही अजिंक्य राहणेच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने २-१ मालिका जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली . (Ajinkya Rahane )






 

अजिंक्य राहणे हा भारतीय क्रिकेट इतिहासातील एकमेव कर्णधार आहे, ज्याने पाचपेक्षा जास्त कसोटी सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आणि एकही सामना गमावला नाही. त्याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने सहा कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आणि दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

Comments
Add Comment

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून