CWG 2026 : नीरजसह तीन भारतीय भालाफेकपटू अंतिम फेरीत

ग्लासगो : दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा २०२६ च्या राष्ट्रकुल खेळांमधील पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र ठरला आहे. नीरजसोबतच, भारताचे रोहित यादव आणि यशवीर सिंग यांनीही पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली.



पात्रता फेरीत कोणीही ८४ मीटरचा स्वयंचलित पात्रतेचा निकष ओलांडला नाही. परिणामी, अव्वल १२ खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले. नीरज चोप्राने ७९.६१ मीटरचा सर्वोत्तम भालाफेक करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आणि तो एकूण क्रमवारीत पाचव्या स्थानावर राहिला.भारताचा रोहित यादव ७८.३७ मीटरच्या भालाफेकीसह नवव्या स्थानावर राहिला आणि यशवीर सिंगने ७८.३६ मीटरच्या भालाफेकीसह अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. अशाप्रकारे, तिन्ही भारतीय भालाफेकपटूंनी पदक फेरी गाठली असून, देशाच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत. (CWG 2026 )



पात्रता फेरीत, श्रीलंकेच्या रुमेश पाथिराजेने ८२.८४ मीटर भालाफेक करून प्रथम क्रमांक पटकावला. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स (८१.२९ मीटर) दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिकेचा डाऊ स्मिट (८०.६४ मीटर) तिसऱ्या स्थानी राहिला. इंग्लंडचा बेन ईस्ट (८०.३८ मीटर) चौथ्या, तर नीरज पाचव्या स्थानी राहिला. पाकिस्तानचा अर्शद नदीम ७८.६३ मीटर भालाफेक करून सातव्या स्थानी राहिला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरला.पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेचा अंतिम सामना १ ऑगस्ट रोजी खेळला जाईल, जिथे नीरज चोप्रा २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपल्या सुवर्णपदकाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. या स्पर्धेत भारताला पदकाच्या प्रबळ आशा आहेत, कारण भारताचे तीन खेळाडू अंतिम फेरीत पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

India vs New Zealand Test : टीम इंडियाला मोठा धक्का ! आकाशदीप दुसऱ्या कसोटीतून बाहेर, प्रसिद्ध कृष्णाला मिळाली संधी

India vs New Zealand Test : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात

न्यूझीलंडसमोर टीम इंडियाची घसरगुंडी! 240 धावांची अजूनही पिछाडी

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी दुसऱ्या दिवशी

आकाशदीपचा क्राइस्टचर्चमध्ये 'पंजा'; न्यूझीलंडचा पहिला डाव 356 धावांत आटोपला, ब्लंडेलचे शतक हुकले...

मुंबई: क्राईस्टचर्चमधील हेगले ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी

'हिटमॅन'चा नंबर गेम! संध्याकाळी 17:45 वाजताच मुंबई इंडियन्सने का केली रोहित शर्माच्या नावाची घोषणा? जाणून घ्या

मुंबई इंडियन्स आयपीएल 2027 स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. मिनी लिलावापूर्वी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. हा

Rohit Sharma : 'चला, सगळ्यांनी छान हसा..', मुंबई इंडियन्सचा कर्णधार होतात रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया Video

IPL 2027 Mumbai Indians Captain Name : रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी विराजमान झाला आहे. मागच्या तीन पर्वात