Dattatray Bharne : एकही पात्र शेतकरी १०० टक्के कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही

 कृषिमंत्री दत्ता भरणे; ऑगस्टमध्ये १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर होणार


मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील एकाही पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही. कर्जमाफीची दुसरी यादी तयार झाली असून ऑगस्ट महिन्यात १६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध केली जातील, अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी केली. तसेच बँकांच्या 'हेअरकट' (आर्थिक तडजोड) मुद्यावरून शेतकऱ्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करत राज्य सरकार आणि बँकांमधील या प्रक्रियेचा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Dattatray Bharne)



पाच जिल्ह्यांतील १६ लाख ९६ हजार शेतकरी खात्यांची दुसरी यादी तयार करण्यात आली असून सर्व माहिती महाआयटी पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांना 'युनिक आयडी' देण्यात आला आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.कर्जमाफीच्या अंमलबजावणीदरम्यान बँकांकडून 'हेअरकट'च्या नावाखाली अडून बसण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. यावर स्पष्टीकरण देताना कृषिमंत्र्यांनी सांगितले की, 'हेअरकट' म्हणजे थकीत कर्जाचा किती वाटा राज्य सरकार उचलणार आणि किती हिस्सा बँक सोडून देणार, याबाबतची राज्य सरकार आणि बँकांमधील अंतर्गत आर्थिक तडजोड आहे. १ वर्षापर्यंत थकीत कर्जावर सरकार ८५ टक्के तर बँक १५ टक्के बोजा सहन करते; तर ४ वर्षांपेक्षा जास्त जुन्या थकीत कर्जावर सरकार ३५ टक्के आणि बँका ६५ टक्के वाटा उचलतात. या सूत्राचा शेतकऱ्यांच्या मूळ कर्जमाफीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि त्यांना १०० टक्के कर्जमाफी मिळेल. (Dattatray Bharne)



५६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार


राज्यभरातील एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे सरकारचे ध्येय असून या योजनेसाठी ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. चालू पावसाळी अधिवेशनातही यासाठी २० हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद मंजूर करण्यात आली आहे. यापूर्वी प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांची मदत मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना आता सुधारित निर्णयानुसार २ लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

ITR Filing 2026 : देशात आयटीआर भरणाऱ्यांचा विक्रमी आकडा; ७.८ कोटींचा टप्पा पार

नवी दिल्ली : देशात आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मूल्यांकन वर्ष

Chandrashekhar Bawankule : अर्थसंकल्पातील मंजूर निधी ओबीसी मंत्रालयाला द्या; ओबीसी मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी

ओबीसी महामंडळांचे प्रश्न डिसेंबरपर्यंत मार्गी परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संख्या वाढविणार बैठकीत १३

Russia Ukraine War : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयासह १२ जणांचा मृत्यू

कीव्ह : रशियाने युक्रेनवर रात्रभर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा आणि इतर ११ जणांचा अशा एकूण १२