FDA : तुकाराम मुंढेंविरुद्ध अधिकाऱ्यांची मंत्री झिरवळ यांच्याकडे तक्रार

कार्यपद्धतीवर आक्षेप; २५ हून अधिक कर्मचाऱ्यांचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांना पत्र


मुंबई : अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या राज्यभरातील कारवाया आणि धडाकेबाज निर्णयांचा धसका प्रशासकीय वर्तुळात बसलेला असतानाच, आता त्यांच्याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात बंड पुकारले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एफडीए प्रयोगशाळेतील तब्बल २९ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मनमानी कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.



संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना सकाळी ९ ते रात्री उशिरापर्यंत काम करावे लागत असून शनिवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही कामावर हजर राहण्याचे कडक देण्यात आल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा न देता अचानक दोन शिफ्ट लागू केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येत असून विश्लेषणाच्या गुणवत्तेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


अन्न, औषधे आणि सौंदर्यप्रसाधनांचे प्रलंबित नमुने जलद गतीने निकाली काढण्याच्या नादात घाईगडबड केली जात असून एका विश्लेषकाकडून त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक नमुने तपासण्याचा दबाव टाकला जात आहे. त्यामुळे विश्लेषणातील अचूकता धोक्यात येण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कार्यालयीन वेळ पूर्ववत लागू करावी, दोन शिफ्टची पद्धत रद्द करावी, शासकीय सुट्ट्यांचा लाभ पूर्ववत मिळावा आणि रिक्त पदे भरून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशा प्रमुख मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Jaykumar Rawal : अत्याधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत मुंबई विमानतळाजवळ ‘नंदगिरी राज्य अतिथीगृह’ उभारणार; मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : विविध राज्यांतून मुंबईत येणाऱ्या मान्यवर अतिथींच्या निवासासोबतच ट्रान्झिट प्रवासादरम्यान

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी मुंबई : मुंबईत सध्या इंटरनेट,

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर