Kirti Kulhari : बॉलीवूड अभिनेत्री सायबर क्राईमची शिकार; अवघ्या काही मिनिटात बँक खाते झाले रिकामे

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सायबर फसवणूक

मनोरंजन विश्वातून एक सायबर फ्रॉड(Cyber ​​Fraud) संबंधी धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिध्द अभिनेत्री आणि निर्माती कीर्ती कुल्हारी हिची सायबर फसवणूक करून बँक खात्यातील पैसे चोरीला गेले आहेत. अज्ञात सायबर गुन्हेगारांनी(Cyber Criminals) तिच्या मोबाईल फोन आणि क्रेडिट कार्डची अनधिकृत माहिती मिळवून अवघ्या काही मिनिटांत २ लाख ४३ हजार ८५२ रुपये काढून घेतले. या प्रकरणी कीर्ति कुल्हारीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.



कीर्ती कुल्हारीने नोंदवलेल्या तक्रारीनंतर अंबोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कीर्ति कुल्हारी या वर्सोवा येथील यारी रोडवरील संगीता अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतात. २४ जुलै २०२६ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास त्या अंधेरी पश्चिमेकडे असणाऱ्या सिनेपोलिस थिएटरमध्ये(Theatre) चित्रपट पाहत होत्या. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर क्रेडिट कार्डवरून एअरोमेक्सिको एअरलाईन्ससाठी २,५२५ $ अमेरिकन डॉलर्स खर्च झाल्याचा अलर्ट संदेश आला.



कीर्ति कुल्हारीला परदेशातील संशयास्पद व्यवहाराचा मेसेज मिळताच त्यांनी तातडीने बँकेच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला. बँकेच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डवरून परवानगीशिवाय चार वेगवेगळे मोठे व्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित क्रेडिट कार्ड(Credit Card)  तात्काळ ब्लॉक करण्यात आले.या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.